घरमनोरंजन15 मार्चला राज्यभर होणार 'शिमगा'

15 मार्चला राज्यभर होणार ‘शिमगा’

Subscribe

शिमगाच्या ट्रेलरमधून या चित्रपटात कोकणातील शिमगोत्सवादरम्यान असलेले जोशमय वातावरण दिसत आहे.त्याचबरोबर केवळ सण नाही तर या सणांवरून गावागावात मानपानावरून होणारे वाद, अंतर्गत राजकारण पाहायला मिळणार आहे.

काही दिवसांपूर्वीच निलेश कृष्णाजीराव पालांडे लिखित, दिग्दर्शित ‘शिमगा’ या चित्रपटाचा टिझर रिलीज झाला. या भन्नाट टीझरमुळे या चित्रपटात काय पाहायला मिळणार याची उत्सुकता वाढली. आता या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. कोकणची शान असलेला आणि ज्या सणाची कोकणासह महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस आवर्जून वाट पाहात असतो तो शिमगोत्सव या चित्रपटात अनुभवता येणार आहे.

काय आहे ट्रेलर

- Advertisement -

ट्रेलरमधून या चित्रपटात कोकणातील शिमगोत्सवादरम्यान असलेले जोशमय वातावरण दिसत आहे.त्याचबरोबर केवळ सण नाही तर या सणांवरून गावागावात मानपानावरून होणारे वाद, अंतर्गत राजकारण पाहायला मिळणार आहे. आक्रमकता, द्वेष, अहंकार, जाळपोळ हे अनुभवत असतानाच हळुवार फुलत जाणारी प्रेमकथाही प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळेल.

शिमग्याच्या गाणी प्रेक्षकांमध्ये हीट

- Advertisement -

शिमगाच्या ट्रेलर आधी गाणी प्रेक्षकांमध्ये हीट ठरली आहेत. चांदणं रातीला आला शिमगा हे शिमग्याच गाणं कोकणवासियांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं आहे. तर रंग तुझा गंध तुझा हे रोमॅण्टीक गाणं तरूणांमध्ये हीट ठरलं आहे.

काय आहे चित्रपटात

एकमेकांबद्दल असलेले मनातील आकस, हेवेदावे अग्नीच्या ज्वाळांमध्ये जळून राख होऊन,नव्या सकारात्मक विचारांनी आयुष्याची सुरुवात व्हावी, यासाठी ‘शिमगा’ सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्याची पूर्वापार परंपरा आहे. आपल्यातील नकारात्मक वृत्तीचा नाश करून, प्रत्येक सण, उत्सव एक परंपरा म्हणून सर्वांनी मिळून एकत्र साजरा करावा, असा साधा, सरळ संदेश यातून देण्यात येत आहे.

Shimga movie new couple
शिमग्याची नवी जोडी

शिमग्याच्या निमित्ताने ‘ही’ नवी जोडी

‘चॉकलेट बॉय’ची इमेज बाजूला ठेवून, भूषण प्रधान याने या चित्रपटात रांगडी भूमिका साकारली आहे. तर मानसी पंड्याच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीला एक नवीन चेहरा मिळाला आहे. याव्यतिरिक्त राजेश शृंगारपुरे, कमलेश सावंत, सुकन्या सुर्वे, विजय आंदळकर यांच्याही या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. 15 मार्चला शिमगा चित्रपटाच्या निमित्ताने राज्यभर साजरा होणार आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -