घरमनोरंजन67th National film Award Live : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा

67th National film Award Live : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा

Subscribe

पुरस्कारांची माहिती पीआयबीने त्यांच्या ट्विटर अकाउंटवर केली आहे.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचा ६७ वा सोहळा सोमवारी ३ तारखेला करण्यात येत आहे. केंद्रिय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर हे राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा करणार आहेत. नॅशनल मिडिया सेंटरमध्ये घोषीत होणाऱ्या पुरस्कारांची माहिती पीआयबीने त्यांच्या ट्विटर अकाउंटवर केली आहे. हे पुरस्कार २०१९ मध्ये प्रदर्शित केलेल्या चित्रपटांसाठी आहेत. या ६७ व्या राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा ३ मे २०२० होणार होती मात्र, कोरोना महामारीमुळे हा सोहळा पुढे ढकलण्यात आला. या पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट वॉइज ओवर अशा अनेक पुरस्कारांचा समावेश आहे.

- Advertisement -

या पुरस्कारामध्ये सुशांत सिंह राजपूत आणि श्रध्दा कपूरचा चित्रपट ‘छिछोरे’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट म्हणून पुरस्कार मिळाला आहे. हा अवॉर्ड एका वर्षाच्या कालावधीनंतर दिला जात आहे. यादरम्यान मल्याळम फिल्म ‘जल्लीकट्टू’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीसाठी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे. याशिवाय केसरी चित्रपटातील ‘तेरी मिट्टी’ या गाण्यासाठी गायक बी प्राक यांना सर्वोत्कृष्ट गायकाचे पुरस्कार देण्यात आला आहे. अभिनेत्री कंगना रनौतला मणिकर्णिका, पंगा या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. अभिनेता मनोज वायपेयी याला भोसले चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेताचा पुरस्कार मिळाला आहे. तसेच धनुषला असुरन या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेताचा पुरस्कार मिळाला आहे.

 

- Advertisement -

 


हेही वाचा – महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा; विरोधकांची मागणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -