घरमनोरंजनअनिकेत विश्वासराव हाजिर हो

अनिकेत विश्वासराव हाजिर हो

Subscribe

परफेक्ट प्लॅनिंग करणार्‍या कलाकारांच्या यादीत सतीश राजवाडे याचे नाव घेतले जाते. नाटक सोडले तर मालिका, चित्रपट यांची जुळवाजुळवा कशी, कधी, केव्हा करायची हे त्याचे ठरलेले असते. आजवर त्याने ते जपलेही आहे आणि त्यामुळेच त्याची प्रत्येक कलाकृती ही फक्त प्रेक्षकप्रियच ठरलेली नाही तर खासही झालेली आहे. ‘मुंबई-पुणे-मुंबई’ या चित्रपटाचा तिसरा भाग जो त्याच्या निमित्ताने मराठीत प्रथमच त्याच्या नावाशी जोडला गेला. हा चित्रपट वेगळा करतो ना करतो तोच त्याने ‘अ परफेक्ट मर्डर’ या नाटकात भूमिका निभावण्याची तयारी दाखवली. आता त्याहीपेक्षा एक मोठी जबाबदारी त्याच्याकडे चालून आली आहे म्हणताना ‘अनिकेत विश्वासराव हाजिर हो’ असे म्हणणे दिग्दर्शकाला भाग पडलेले आहे.

‘अ परफेक्ट मर्डर’ या नाटकाचे लेखन निरज शिरावईकर याने केले असून विजय केंकरे हे त्याचे दिग्दर्शक आहेत. या नाटकाच्या बाबतीत एक चांगली गोष्ट घडलेली आहे, ती म्हणजे झी ची सात नामांकने या नाटकाला प्राप्त झालेली आहेत. त्यात भूमिका निभावणार्‍या सतीशला सहाय्य अभिनेत्यासाठी संभाव्य यादीत निवडले होते. खरंतर नाटकाला मिळालेले यश लक्षात घेता त्याने प्रयोगात सातत्य ठेवायला हवे होते. स्टार प्रवाहचा मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या जबाबदार्‍या अधिक असल्यामुळे त्याने हे नाटक तूर्तास सोडलेले आहे. दिग्दर्शक विजय केंकरे यांनी ही भूमिका अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्यावर सोपवलेली आहे. मालिकेमुळे लोकांसमोर आलेला हा अभिनेता पुढे चित्रपटात अधिक गुंतला आणि इच्छा असूनही त्याला नाटकात काम करता आलेले नाही. या निमित्ताने तो पुन्हा आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -