घरक्रीडाधोनीने मला संघातून बाहेर जाण्यापासून वाचवले

धोनीने मला संघातून बाहेर जाण्यापासून वाचवले

Subscribe

भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने मागील २-३ वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण प्रदर्शन केले आहे. मात्र, त्याआधी इशांत हा फक्त एक प्रतिभावान गोलंदाज म्हणून ओळखला जायचा. त्याच्या प्रदर्शनात सातत्याचा अभाव होता. त्यामुळे त्याच्यावर काहीवेळा संघातून बाहेर जाण्याची वेळ येणार होती. मात्र, माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने मला बर्‍याचदा संघातून बाहेर जाण्यापासून वाचवले, अशी कबुली इशांतने दिली आहे.

माही भाईचा (धोनी) मी सदैव आभारी राहीन. त्याने मला अनेकदा संघातून बाहेर जाण्यापासून वाचवले. त्याने मला खूप पाठिंबा दिला आहे. आता मी अनुभवी खेळाडू असल्यामुळे कित्येकदा विराट कोहली सामन्यादरम्यान माझ्याकडे येतो आणि आदराने मला काही गोष्टी विचारतो. तू कितीही थकला असशील तरी संघातील अनुभवी गोलंदाज या नात्याने तुला संघासाठी काही गोष्टी कराव्या लागतील असेही विराट मला सांगतो. सुरुवातीला केवळ चांगली गोलंदाजी करणे हे माझे ध्येय होते. मात्र, आता चांगल्या गोलंदाजीसोबतच जास्तीत-जास्त विकेट काढण्यावर माझा भर असतो. तुम्ही जर विकेट घेतल्यात तर लोक तुमच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघतात, असे इशांत म्हणाला.

- Advertisement -

इंग्लंडमध्ये २०१३ साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये इशांतने चांगली कामगिरी केली होती. मात्र, त्याला २०१६ नंतर भारताच्या एकदिवसीय संघात स्थान मिळालेले नाही. याबाबत तो म्हणाला, हल्ली लोक तुमच्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात यावर खूप काही अवलंबून असते. असे का आहे याची मला कल्पना नाही. मी आता आयपीएलकडे एक संधी म्हणून पाहतो. जर यात मी चांगली कामगिरी केली तर कदाचित मलाही विश्वचषकासाठी संधी मिळू शकेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -