घरताज्या घडामोडीफ्रॅक्चरनंतर अभिषेक बच्चनच्या हाताची सर्जरी, म्हणाला 'मर्द को कभी दर्द नही होता'

फ्रॅक्चरनंतर अभिषेक बच्चनच्या हाताची सर्जरी, म्हणाला ‘मर्द को कभी दर्द नही होता’

Subscribe

अभिषेकने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याच्या उजव्या हाताला प्लॉस्टर करण्यात आले आहे.

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) सध्या चर्चेत आहे तो म्हणजे त्याच्या एका पोस्टमुळे. अभिषेक बच्चनचा एका सिनेमाच्या शुटींगदरम्यान अपघात झाला. यात त्यांच्या हाताला दुखापत झाली. आधी हात फ्रॅक्चर करण्यात आला त्यानंतर त्याच्या हाताची सर्जरी करावी लागली. अभिषेकच्या हाताची सर्जरी व्यवस्थित पार पडली असून अभिषेकने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर ही माहिती त्याच्या चाहत्यांना दिली. (Abhishek Bachchan hand surgery after an accidental fracture on the Film set )

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhishek Bachchan (@bachchan)

- Advertisement -

अभिषेकने त्याच्या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, ‘चेन्नईला नव्या सिनेमाची शुटींग सुरू असताना बुधवारी सेटवर एक अपघात झाला. माझा हात फ्रॅक्चर झाला त्यानंतर हाताची सर्जरी करावी लागली. त्यानिमित्ताने मुंबईत माझी छोटीशी ट्रीप झाली. सर्जरी झाली आहे. पॅचअप आणि कास्ट झाले आहे. आता कामासाठी पुन्हा चेन्नईला परत आलोय. म्हणतात ना की… शो सुरू राहिला पाहिजे. माझे वडिल देखील म्हणातात ‘मर्द को कभी दर्द नही होता’. ओके ओके आके थोड त्रास होतो. तुमच्या सर्वांच्या आशिर्वादामुळे मी लवकर बरा झालो तुमच्या मेसेजससाठी धन्यवादट, अशी सविस्तर पोस्ट अभिषेक बच्चनने लिहिली आहे.

अभिषेकने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याच्या उजव्या हाताला प्लॉस्टर करण्यात आले आहे. अभिषेकच्या पोस्टनंतर अनेक बॉलिवूड कलाकारांच्या कमेंट आल्या आहेत. बॉबी देओल, श्वेता बच्चन, आनंद अहुजा,जेलिनिया देशमुख, रितेश देशमुख, सोनाली ब्रेंदे, जोया अख्तर,करण जौहर यांसारख्या अनेक कलाकारांनी अभिषेकला त्याच्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisement -

अभिषेक बच्चन लवकरच ‘बॉब बिस्वास’ या सिनेमात दिसणार आहे. शाहरुख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट द्वारे हा सिनेमा प्रोड्यूस करण्यात आला आहे. २०१२ च्या थ्रिलर फिल्म कहानीचा स्पिन ऑफ आहे.


हेही वाचा – लग्नाचा फोटो शेअर करत अनुपम खेर यांनी किरण खेरला दिल्या शुभेच्छा

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -