घरमनोरंजनहॅप्पी बर्थडे अमेय वाघ!

हॅप्पी बर्थडे अमेय वाघ!

Subscribe

अभिनेता अमेय वाघ आज ३० वा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने त्याला सहकलाकार आणि चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठी चित्रपट, नाटक आणि छोटा पडदा सर्वच क्षेत्रात अगदी कमी काळात स्वतःची वेगळी ओळख बनवणाऱ्या दिल दोस्ती दुनियादारीचा कैवल्य म्हणजेच अभिनेता अमेय वाघ आज ३० वा वाढदिवस साजरा करत आहे. सध्या टीव्हीवर त्याचा सुपर डान्सर महाराष्ट्र हा रिअॅलिटी शो सुरु असून तो या शोचे सूत्रसंचालन करत आहे. या कार्यक्रमातील परिक्षक अभिनेत्री अमृता खानविलकर हिने ट्विटरच्या माध्यमातून अमेयला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisement -

अमेयची फिल्मी कारकिर्द 

मराठी तसेच हिंदी चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचे कौशल्या दाखवणाऱ्या अमेयने खुपच कमी वेळात लोकप्रियता मिळवली. त्याने रंगभूमीपासून आपल्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीची सुरुवात केली असून नाटकांमध्ये बालकलाकार म्हणून देखील प्रेक्षकांना परिचित आहे. अमेय वाघ याची आठवणीतील काही नाटकं म्हणजे दळण, गेले २१ वर्ष, संगीत मान अपमान, कट्यार काळजात खुसली, नटसम्राट आणि सध्या तुफान लोकप्रिय होत असलेला अमर फोटो स्टुडिओ. त्याशिवाय त्याने पोपट, घंटा, यशवंती, अग्निदिव्य, जोशी की कांबळे, शटर, बिल्लू, अय्या सारखी मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. मात्र मुरांबा आणि फास्टर फेणे या दोन चित्रपटांमधील त्याच्या भूमिकांचे प्रेक्षक आणि समीक्षकांकडून विशेष कौतुक झाले. तर छोट्या पडद्यावरही अनेक रिअॅलिटी शो आणि अॅवॉर्ड शो त्याने होस्ट केले आहेत. तर दिल दोस्ती दुनियादारीमधील कैवल्यच्या भूमिकेमुळे तो तरुणींचा फेवरिट बनला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -