घरमनोरंजन'माझं मराठी असणं मला जास्त स्टायलिश वाटतं'

‘माझं मराठी असणं मला जास्त स्टायलिश वाटतं’

Subscribe

मराठी चित्रपटसृष्टीचा युवास्टार ‘अमेय वाघ’ चा स्वेग आता संपूर्ण महाराष्ट्रात पसरला आहे. चित्रपट, लघुचित्रपट, मालिका, नाटक आणि वेबसिरीज अश्या प्रत्येक माध्यमातून आपल्या अभिनयाची छबी उमटवणाऱ्या या अभिनेत्याने मराठी प्रादेशीक अभिनय क्षेत्रात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. तरुण पिढींच्या गळ्यातला ताईत झालेल्या या तरुण कलाकाराच्या स्टाईलची सर्वत्र चर्चा देखील होत असते. आपल्या प्रत्येक प्रोजेक्टच्या प्रमोशनला हटके फेशन करणाऱ्या या अवलीयाची दखल नुकत्याच झालेल्या लोकमत मोस्ट स्टायलिश अवार्डने घेतली.

- Advertisement -

दिमाखात पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्यात अमेयला प्रादेशिक चित्रपट (डिजिटल) विभागात सर्वोत्कृष्ट स्टायलिश अभिनेत्याचा किताब मिळाला. हा किताब स्वीकारताना अमेयने मराठी प्रेक्षकांना त्यांचे श्रेय दिले. ‘माझं मराठी भाषेवर आणि माझ्या कलेवर प्रेम आहे, माझं मराठी असणं मला जास्त स्टायलिश वाटतं, त्यामुळे हे अवॉर्ड मी माझ्या सर्व मराठी प्रेक्षकांना डेडिकेट करतो’ असे भावोद्गार त्याने काढले.

- Advertisement -

मुरंबा,फास्टर फेणे या चित्रपटांमधून अमेय वाघची जादू रसिक प्रेक्षकांवर पसरली तर अमर फोटो स्टुडिओ या नाटकामुळे अमेयच्या अभिनयाचे प्रेक्षक फॅन झाले. लवकरच अमेयचा धुराळा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ३ जानेवारीला प्रदर्शित होत असलेल्या या चित्रपटाद्वारे आपला हा लाडका ‘वाघ’ राजकीय धुरळा उडवायला तयार झाला आहे. नवीन वर्षाच्या या धमाकेदार सुरुवातीबरोबरच अमेय आणखीन बऱ्याच गोष्टी आपल्या चाहत्यांसमोर घेऊन येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -