घरताज्या घडामोडीसर्जरीनंतर अभिनेता रणदीप हुड्डाला रुग्णालयातून डिस्चार्ज, व्हिडीओ व्हायरल

सर्जरीनंतर अभिनेता रणदीप हुड्डाला रुग्णालयातून डिस्चार्ज, व्हिडीओ व्हायरल

Subscribe

कोकिलाबेन धीरुबाई अंबानी रुग्णालयातून रणदीपला वॉकरच्या सहाय्याने रुग्णालयातून  पडताना स्पॉट करण्यात आले. रणदीप रुग्णालयातून बाहेर येतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओत रणदीपने रेड कलरचा टी शर्ट घालता असून त्याच्या उजव्या पायाला प्लास्टर केले आहे.

बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डाचा त्याच्या आगामी इंस्पेक्टर अविनाश या सिरीजच्या सेटवर अपघात झाला. या अपघातात त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. बुधवारी त्याला मुंबईच्या कोकिलाबेन धीरुबाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या पायाला झालेली दुखापत इतकी गंभीर होती कि त्याच्यावर गुडघ्याची शस्त्रक्रिया करावी लागली. बुधवारी रणदीपवर शस्त्रक्रिया करण्यात आली.  रणदीपच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्याला रुग्णालयात डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्जनंतर रणदीप पापाराझींच्या कॅमेरात कैद झाला असून त्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायल होत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

- Advertisement -

कोकिलाबेन धीरुबाई अंबानी रुग्णालयातून रणदीपला वॉकरच्या सहाय्याने रुग्णालयातून  पडताना स्पॉट करण्यात आले. रणदीप रुग्णालयातून बाहेर येतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओत रणदीपने रेड कलरचा टी शर्ट घालता असून त्याच्या उजव्या पायाला प्लास्टर केले आहे. व्हिडीओत रणदीप वॉकर आणि मित्राच्या मदतीच्या सहाय्याने  रुग्णालयाच्या पायऱ्या उतरुन त्याच्या कारमध्ये बसताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Randeep Hooda (@randeephooda)

- Advertisement -

‘दुखापत माझ्या गुडघ्या झाली पण मला काही आठवत का नाहीये’, असे म्हणत रणदीपने त्याच्या इन्स्टाग्रामवर त्याचा फोटो शेअर करत हसणाऱ्या आणि कंफ्यूज्ड इमोजी शेअर केल्या आहेत.

 

रणदीपचा सेटवर झालेल्या अपघातानंतर त्याच्या चाहत्यांनी त्याच्या फोटोवर कमेंट करत त्याच्याविषयी काळजी व्यक्त केलीय. त्याचप्रमाणे त्याच्या रिकव्हरीसाठी प्रार्थना देखील केलीय. रणदीपच्या पोस्टवर एका युझरने म्हटलेय, ‘सर मेंदू गुडघ्यात आहे असे लहानपणी सांगायचे मला वाटते तुमच्यासोबतही असेच झाले असेल’. तर दुसऱ्या युझरने म्हटलेय, ‘अनेक लोकांचा मेंदू गुडघ्यात असतो त्याचाच हा परिणाम आहे’. तर काही युझर्सनी रणदीपच्या रिकव्हरीसाठी प्रार्थना करत म्हटले, ‘वाघ काहीही लक्षात ठेवत नाही, वाघाला संपूर्ण दुनिया लक्षात ठेवते’.


हेही वाचा – आदित्य नारायणच्या घरी आली नवी पाहुणी

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -