घरमनोरंजन'भारत'नंतर 'किक २'मध्येही दिसणार सलमान-दिशाची जोडी?

‘भारत’नंतर ‘किक २’मध्येही दिसणार सलमान-दिशाची जोडी?

Subscribe

ग्लॅंमर लूक आणि स्टाईलिश असणाऱ्या अंदाजामुळे चर्चेत आली आहे

अभिनेत्री दिशा पटानीने कमी चित्रपटात काम केले असेले तरी तिच्या ग्लॅंमर लूक आणि स्टाईलिश असणाऱ्या अंदाजामुळे चर्चेत आली आहे. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या भारत या चित्रपटात दिशा पटानी दिसणार आहे. या चित्रपटात स्लो मोशनमध्ये तिचा रेट्रो आणि साडीतील लूक प्रेक्षकांसह चाहत्यांच्या पसंतीत उतरत आहे.

- Advertisement -

सध्या चर्चा आहे ती म्हणजे या चित्रपटानंतर दिशा पटानी सलमान खानच्या किक २ या चित्रपटात सोबत अभिनय करताना दिसणार आहे. परंतु दिशाचे याबद्दल वेगळेच म्हणने आहे. नुकताच दिशा पटानीला याबद्दल प्रश्न विचारला असता, तिने या प्रश्नाचे खंडन केले आहे. तिने असे सांगितले की, किक २ या चित्रपटाकरिता विचारण्यात आले नाही, परंतु दिशा पटानीची मनापासून सलमान सोबत किक २ मध्ये काम करण्याची इच्छा आहे. जर सलमान सोबत काम करण्याची संधी मिळाली तर नक्कीच काम करायला आवडेल असे तिने सांगितले. दिशाची ही इच्छा किक २ या चित्रपट निर्मात्यांपर्यंत पोहचली तर दिशाचे स्वप्न लवकरच पुर्ण होईल.

 

View this post on Instagram

 

?

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

- Advertisement -

सध्या तरी ती भारत या चित्रपटाकरिता खूपच उत्सुक आहे. या चित्रपटात सलमान सोबत काम करणं हे काही स्वप्न पुर्ण होण्यासारखेच आहे. भारत शिवाय अभिनेता सिद्धार्थ रॉय कपूरसोबत मलंग चित्रपटात दिसणार आहे.

भारत हा चित्रपट ५ जून रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटात सलमान आणि दिशा शिवाय कतरिना कैफ, सुनील गोवर, आसिफ शेख. जॉकी श्रॉफ, तबू, सतीश कौशिक आणि सोनाली कुलकर्णी हे स्टार कास्ट देखील दिसणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -