Eco friendly bappa Competition
घर CORONA UPDATE Coronavirus: जीवावर खेळून बॉलिवूडची अभिनेत्री कोरोनाबाधितांसाठी बनली नर्स

Coronavirus: जीवावर खेळून बॉलिवूडची अभिनेत्री कोरोनाबाधितांसाठी बनली नर्स

Subscribe

भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर बॉलिवूडचे सर्व कलाकार घरातच क्वारंटाईन झालेले आहेत. काही सेलिब्रिटी रोजच्या रोज सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करुन चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसऱ्या बाजुला बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीने आपल्या कामाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. शाहरुख खानच्या फॅन चित्रपटात दिसलेली अभिनेत्री शिखा मल्होत्रा मुंबई महानगरपालिकेच्या स्व. बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर हॉस्पिटलमध्ये नर्सचे काम करत आहे. शिखाच्या या निर्णयाचे सोशल मीडियावर चांगलेच कौतुक होत आहे.

मुंबई ही भारतातील कोरोनाग्रस्तांची राजधानी बनली आहे. मुंबईत सर्वात जास्त रुग्ण आढळले असून ते महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत आहे. अशातच मनपाच्या एखाद्या रुग्णालयात सेवा देणे म्हणजे धोका पत्करणे. पण हा धोका शीखाने स्वीकारला आहे. शिखा बॉलिवूडमध्ये फारशी चमक दाखवू शकली नाही, मात्र तिच्या या निर्णयाने तिने चांगलीच दाद मिळवली आहे. जोगेश्वरी येथील मनपाच्या रुग्णालयात व्हॉलेंटियर नर्स म्हणून काम करण्याची संधी शिखाला मिळाली आहे.

- Advertisement -

आपल्या कामाच्या बाबतीत बोलताना शिखाने सांगितले की, “जेव्हा २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर झाला. तेव्हाच तेव्हाच मी नर्स म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला. आता एकही दिवस घरी बसायचे नाही. २१ दिवसानंतरही सगळं काही सुरळीत होणार नाही. रुग्ण वाढत जातील आणि नर्सेसची गरज भासणार”

- Advertisement -

बॉलिवूडमध्ये येण्याच्या आधी शिखाने दिल्लीत नर्सच्या ट्रेनिंगचा पुर्ण कोर्स केलेला आहे. दिल्लीच्या वर्धमान महावीर मेडिकल कॉलेज आणि सफदरजंग हॉस्पिटलमध्ये तिने २०१४ साली नर्सिंगचा कोर्स केला होता. अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवण्याआधी तिने काही काळ नर्स म्हणून देखील काम केले होते. सध्या शिखाची ड्युटी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात आहे.

View this post on Instagram

She is an actress who was seen in the lead in the critically aclaimed film #Kannchli with actor #SanjayMishra . Shikha Malhotra joined the BMC-run trauma hospital in Jogeshwari as a volunteer nurse on Friday. She has also urged all retired doctors and nurses to join the fight against Coronavirus at this crucual time. Shikha completed her nursing course from Vardhman Mahavir Medical College and Safdarjung Hospital in New Delhi in 2014. As she moved towards acting, she never worked as one. BMC gave Shikha its approval letter and asked her to join the Hinduhrudaysamrat Balasaheb Thackeray Trauma Hospital in Jogeshwari East. She has been deputed in the isolation ward. "After passing the course in college, we had taken the oath to serve society. I think this is the time to do so," she says. #viralbhayani #CoronaVirus #covid2019 @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

नर्सचे काम हाती घेतल्यानंतर शिखाने सांगितले आहे की, “जोपर्यंत पंतप्रधान सगळं काही ठिक झाल्याचे सांगत नाहीत, तोपर्यंत मी नर्सची सेवा देत राहणार. मग यासाठी कितीही महिने काम करावे लागले तरी चालेल.” संजय मिश्रा यांच्या कांचली या चित्रपटात तिने मुख्य भूमिका साकारली होती. मात्र कमी बजेट असलेल्या या चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळू शकला नव्हता.

- Advertisment -