घरCORONA UPDATE‘कोरोना’च्या संकटाच्यावेळी काम करणाऱ्यांना ५० लाखांचा विमा कवच द्या!

‘कोरोना’च्या संकटाच्यावेळी काम करणाऱ्यांना ५० लाखांचा विमा कवच द्या!

Subscribe

सर्व  महापालिका कामगार, कर्मचारी व अधिकारी यांचा  रुपये ५० लाखाचा विमा उतरविण्याची मागणी आता कामगार संघटनांकडून होवू लागली आहे.

‘कोरोना’ विषाणूच्या प्रसारास प्रतिबंध  करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या सर्व  महापालिका कामगार, कर्मचारी व अधिकारी यांचा  रुपये ५० लाखाचा विमा उतरविण्याची मागणी आता कामगार संघटनांकडून होवू लागली आहे. महापालिकेच्या कामगार, कर्मचाऱ्यांचा गटविमा आरोग्य योजना बंद झाल्यानंतर सध्या कामगारांना कोणत्याही प्रकारचा विम्याचे कवच नाही. त्यामुळे अशी मागणी आता जोर धरु लागली असून दि म्युनिसिपल युनियनने महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूच्या संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेचे कामगार, कर्मचारी अहोरात्र कर्तव्य बजावत आहेत. आपली व आपल्या कुटुंबीयांची काळजी न करता जीवावर उदार होऊन जे कामगार कर्मचारी अधिकारी कर्तव्य बजावत आहेत.  अशा महापालिकेच्या कामगार,कर्मचारी,अधिकारी,डॉक्टर्स, परिचारिका,तंत्रज्ञ, सुरक्षा दल कर्मचारी,अग्निशमन दल कर्मचारी,कीटक नाशक विभागातील कामगार व एनजीओ कामगार,सार्वजनिक आरोग्य खात्यातील आरोग्य सेविका, आर सी एच -२ व मुंबई जिल्हा क्षय रोग नियंत्रण सोसायटी मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह सर्व कामगार कर्मचारी अधिकाऱ्यांचा शासन व प्रशासनाने निश्चित केलेल्या धोरणानुसार ५० लाख रुपयांचा विमा उतरविण्यात यावा,अशी मागणी दि म्युनिसिपल युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी आयुक्तांकडे केली आहे.

- Advertisement -

 

अशाप्रकारच्या विम्याचे कवच जर महापालिकेने उपलब्ध करून दिल्यास  सर्व कामगार कर्मचारी अधिकारी अजुन जोमाने कामास लागतील. आणि कोरोना विषाणूच्या महाभयंकर संकटावर मात करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करून मुंबईकरांचे आरोग्य अबाधित ठेवतील,असाही विश्वास व्यक्त केला आहे.

- Advertisement -

 

रिक्त जागा त्वरीत भरा

मुंबई महापालिकेच्या आस्थापना अनुसूची वरीलअनेक  रिक्त पदे असून ही सर्व रिक्तपदे सध्या कार्यरत  असलेल्या कंत्राटी कामगारांमधून भरण्यात यावी अशीही मागणी दि म्युनिसिपल युनियनने केली आहे.

आस्थापनाची पदे रिक्त

मुंबई महापालिके च्या आस्थापना अनुसूचीवर एकूण  १ लाख ५६ हजर पदे आहेत.  त्यातील १ लाख तीन  हजार पदे कार्यरत असून सुमारे ५३ हजार पदे रिक्त आहेत.  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व अत्यावश्यक सेवेतील रिक्त पदे लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने सर्व रिक्त पदे भरण्याबाबत सोमवारी  निर्णय घेतला आहे, त्याच धर्तीवर मुंबई महापालिकेच्या आस्थापना अनुसूची वरील रिक्त पदे भरण्याबाबत त्वरीत निर्णय घ्यावा व ही पदे भरत असताना सदर पदांवर सध्या मनपात कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांना ,की ज्यांना मनपाच्या कामाचा अनुभव आहे, अशांना सामावून घ्यावे,अशी सूचना युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -