घरमनोरंजन'माझा अगडबम' मधलं 'हे' विनोदी गाणं एकदा बघाच!

‘माझा अगडबम’ मधलं ‘हे’ विनोदी गाणं एकदा बघाच!

Subscribe

'अगडबम २' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातून सुबोध बावे आणि तृप्ती भोईर ही नवी जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटातील विनोदी गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे.

‘अटकमटक’चा डाव प्रत्येकाने आपल्या लहानपणी खेळला असेल! धम्माल मस्ती आणि पोटभर हसू आणणाऱ्या या बैठी खेळाचे बोल, आता नव्या रुपात आपल्यासमोर येणार आहेत. ‘पॅन इंडिया लिमिटेड कंपनी’चे जयंतीलाल गडा आणि तृप्ती भोईर फिल्म्स प्रस्तुत ‘माझा अगडबम’ या चित्रपटातील ‘अटकमटक’ हे गाणे प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन करणारे आहे. सोशल नेटवर्किंग साईटवर नुकतेच हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. हे विनोदी गाणे, ‘माझा अगडबम’ सिनेमातील ‘नाजुका’ या प्रमुख पात्रावर चित्रित केले आहे.

प्रेक्षकांना ठेका धरायला भाग पाडणाऱ्या या धम्माल गाण्याला आनंद शिंदे यांचा दमदार आवाज लाभला आहे. मंदार चोळकर यांनी शब्दबद्ध केलेल्या या ‘अटकमटक’ गाण्याला टी. सतीश चक्रवर्ती यांनी संगीत दिले आहे. नाजुकाच्या विविध करामती दाखवणारे हे गाणे पाहणाऱ्यांना मनोरंजनाची नवी ‘चटक’ लावून जाते. सुपरहिट ‘अगडबम’चा दमदार सिक्वेल असलेल्या या ‘माझा अगडबम’चे दिग्दर्शन आणि लेखन तृप्ती भोईरनेच केलं आहे.

- Advertisement -

तगडी स्टारकास्ट

येत्या २६ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेल्या या सिनेमात तृप्ती भोईर आणि सुबोध भावे यांची प्रमुख भूमिका आहे. अभिनेता सुबोध भावे यांचा नुकताच ‘सविता दामोदर परांजपे’ हा चित्रपट प्रदर्शित झाला तर ‘काशीनाथ घाणेकर’ आणि ‘शुभ लग्न सावधान’ हे दोन चित्रपट लवकरच प्रदर्शित होतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -