घरमनोरंजन'थँक गॉड' मध्ये अजय देवगण साकारणार चित्रगुप्ताची भूमिका

‘थँक गॉड’ मध्ये अजय देवगण साकारणार चित्रगुप्ताची भूमिका

Subscribe

अजय देवगणने पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये अजय देवगणने काळ्या रंगाचा सूट घालून एका सिंहासनावर बसलेला आहे.

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण लवकरच एका नव्या चित्रपटात झळकणार आहे. ‘थँक गॉड’ असं या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटात अजय देवगणसोबत अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा सुद्धा मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा पोस्टर आणि ट्रेलर प्रदर्शित झाला असून याबाबत माहिती देत अजय देवगणने त्याच्या ट्वीट अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली होती.

अजय देवगणने ‘थँक गॉड’च्या या चित्रपटामध्ये अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत अभिनेत्री रकुल प्रीत सिंह सुद्धा दिसणार आहे. मागील अनेक दिवसांपासून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, अजय देवगणने पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये अजय देवगणने काळ्या रंगाचा सूट घालून एका सिंहासनावर बसलेला आहे. शिवाय या पोस्टसोबत अजय देवगणने लिहिलंय की, या दिवाळीला तुमच्या कुटुंबासोबत आणि तुमच्यासोबत एक खेळ खेळण्यासाठी येत आहे चित्रगुप्त.”

- Advertisement -

दरम्यान, आता चित्रपटाच्या पोस्टरनंतर चित्रपटाचा ट्रेलर देखील प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरमध्ये अजय देवगण चित्रगुप्तच्या भूमिकेत दिसणार आहे. जो हिंदू धर्मानुसार, प्रत्येक माणसाच्या आयुष्याची सर्व गोष्टी लिहून ठेवतो. तोच सिद्धार्थ मल्होत्राच्या आयुष्यामध्ये त्याच्या कर्मांता हिशोब करताना दिसेल. रकुल प्रीत सिंह एका पोलिस अधिकारीच्या भूमिकेत दिसेल.

जबरदस्त आहे चित्रपटाचा ट्रेलर

- Advertisement -

चित्रपटातील ट्रेलरच्या सुरूवातीला दाखवण्यात येत आहे की, सिद्धार्थ मल्होत्राचा गाडी चालवताना अपघात होतो. त्यानंतर सिद्धार्थ अजय देवगण पाशी जातो. इथे गेल्यावर अजय देवगण त्याच्या आयुष्यातील चुका त्याला सांगतो. हा धमाकेदार ट्रेलर पाहून प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत.

या दिवशी होणार चित्रपट प्रदर्शित
अजय देवगणचा हा चित्रपट 25 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा, रकुल प्रीत सिंह बरोबरच अभिनेत्री नोरा फतेही देखील दिसणार आहे.


हेही वाचा :

‘ब्रह्मास्त्र’ला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद; पहिल्या दिवशी कमावला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -