घरमहाराष्ट्रयाकूबच्या चुलत भावासोबत फडणवीस, राज्यपाल कोश्यारींचा फोटो! विरोधकांकडून भाजपच्या आरोपांवर पलटवार

याकूबच्या चुलत भावासोबत फडणवीस, राज्यपाल कोश्यारींचा फोटो! विरोधकांकडून भाजपच्या आरोपांवर पलटवार

Subscribe

याकूह मेमनच्या कबरीच्या सजावटीसाठी टायगर मेमनच्या नावाची धमकी देणाऱ्या रऊफ मेमनसोबत शिवसेना नेत्या किशोरी पेंडणेकर यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यावरून आता भाजपकडून किशोरी पेडणेकरांना कात्रीत पकडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र पेडणेकरांनी आज पत्रकार परिषद घेत भाजपच्या आरोपांवर पलटवार केला आहे. किशोरी पेडणेकर यांनी रऊफ मेमन आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक फोटो ट्विट केला आहे. तसेच आरोप करणाऱ्या भाजपच्या बारा तोंडांनी या फोटोला कॅप्शन सुचवा असा खोचक टोलाही लगावला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने रऊफ मेमन आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा एक फोटो ट्विट केला आहे. पेडणेकर यांनी ट्वीट केलेल्या फोटोत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेदेखील दिसत आहेत.

तर दुसरीकडे भाजपने केले आरोप फेटाळत महापौर असताना धार्मिक स्थळांच्या तक्रारी ऐकण्यासाठी मी गेले होते. बैठकीला कोण कोण उपस्थित होते, याची मला कल्पना नाही. एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय स्त्रींवर आरोप करुन भाजपला काय मिळतं. आम्हाला बदनाम करण्याचे षडयंत्र आखलं जात आहे, आमचा गुन्हेगारांशी संबंध असण्याचा प्रश्नच नाही. मात्र वारंवार कुठल्या ना कुठल्या प्रकरणावरुन आमच्यावर आरोप करुन आमचं संयमी नेतृत्व कसं भडकेल, याची वाट भाजप पाहत आहे असा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.

- Advertisement -

मुंबईतील बडा कब्रस्तान येथे याकूब मेननची कबर आहे. या कबरीची काही दिवसांपूर्वी सजावट केल्याचे समोर आले होते. या सजावटीवरून भाजप – शिवसेनेत आरोप प्रत्यारोप सुरु झाले, किशोर पेडणेकर आणि रऊफ मेमनसोबतच्या बैठकीतला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी किशोरी पेडणेकर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. तसेच महाविकास आघाडीचे नेते आणि टायगर मेमन, दाऊदच्या संबंधाच्या चौकशीची मागणी भाजपने केली. यानंतर आता शिवसेना आणि काँग्रेसने भाजपच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

- Advertisement -

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत आता या प्रकरणात उडी घेत भाजपवर निशाणा साधला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि रऊफ मेमन यांचा फोटो शेअर करत सावंत यांनी रऊफ मेमन ते हेच का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.


औरंगाबमधील प्रसिद्ध यूट्युबर बिंदास्त काव्या बेपत्ता; पोलिसांत गुन्हा दाखल


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -