घरमनोरंजनअक्षयच्या 'राम सेतू'ने 9 दिवसात कमावले केवळ एवढे कोटी

अक्षयच्या ‘राम सेतू’ने 9 दिवसात कमावले केवळ एवढे कोटी

Subscribe

या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी जवळपास 15.25 कोटींची कमाई केली तर दुसऱ्या दिवशी 11.4 कोटींची कमाई केली आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 8.75 कोटींची कमाई केली होती. चौथ्या दिवशी या चित्रपटाने 6.05 कोटी कमावले.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा बहुचर्चित ‘राम सेतू’ चित्रपट 25 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. मात्र, 9 दिवसात या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर हवी तशी कमाई केलेली नाही. प्रदर्शनाच्या सुरुवातीच्या दिवशी या चित्रपटाने बऱ्यापैकी कमाई केली होती. मात्र, हळूहळू या कमाईत घसरण होताना दिसत आहे. दरम्यान, अशातच आता ‘राम सेतू’च्या कमाईचा आज शेवटचा दिवस ठरु शकतो. कारण, येत्या शुक्रवारी 3 नवे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. ज्यामुळे प्रेक्षक ‘राम सेतू’ पाहण्यास पसंती देतील की नाही हे सांगता येत नाही.

2022 अक्षय कुमारच्या चित्रपटांसाठी खराब वर्ष
2022 मध्ये प्रदर्शित झालेला अक्षय कुमरचा एकही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा उत्तम ठरला नाही. वर्षाच्या सुरुवातीला अक्षयचा ‘बच्चन पांडे’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. त्यानंतर अक्षयचा ‘सम्राट पृथ्वीराज’ देखील प्रदर्शित झाला. या चित्रपटाने देखील फारशी कमाई केली नाही. त्यानंतर अक्षयचा ‘रक्षाबंधन’ आणि आता ‘राम सेतू’ यांनी देखील बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही.

- Advertisement -

दरम्यान, या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी जवळपास 15.25 कोटींची कमाई केली तर दुसऱ्या दिवशी 11.4 कोटींची कमाई केली आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 8.75 कोटींची कमाई केली होती. चौथ्या दिवशी या चित्रपटाने 6.05 कोटी कमावले, तर पाचव्या दिवशी 7.7 कोटी आणि सहाव्या दिवशी 8.50 कोटी कमावले. तर आठव्या दिवशी चित्रपटाने 2.90 कोटींची कमाई केली. तसेच नवव्या दिवशी या चित्रपटाने फक्त 2.20 कोटींची कमाई केली. आत्तापर्यंत एकूण या चित्रपटाने 64.05 कोटींची कमाई केली होती.

देशभरातील 3000 स्क्रीन्स वर झाला होता प्रदर्शित
अभिषेक शर्मा यांच्या दिग्दर्शनात तयार झालेला हा चित्रपट देशभरातील 3000 स्क्रीन्स वर प्रदर्शित झाला आहे. ‘राम सेतू’मध्ये अक्षय कुमार आणि जॅकलीन फर्नांडिस व्यतिरिक्त अभिनेत्री नुसरत भरुच देखील मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटामध्ये अक्षय कुमाराने एका आर्कियोलॉजिस्टची भूमिका साकारली आहे. जो आपल्या टीमसोबत राम सेतुच्या अस्तित्वाला वाचवण्यासाठी 7 हजार वर्ष जुन्या इतिहासाचा पडदा हटवताना दिसून येईल.

- Advertisement -

 


हेही वाचा :

अक्षय कुमारच्या ‘राम सेतू’ने केला 50 कोटींच्या कमाईचा टप्पा पार

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -