घरमनोरंजन'कलंक'मध्ये बघा 'या' दोन अभिनेत्रींचा बहारदार डान्स!

‘कलंक’मध्ये बघा ‘या’ दोन अभिनेत्रींचा बहारदार डान्स!

Subscribe

‘कलंक’ या चित्रपटासाठी आलिया सध्या कथ्थकचे प्रशिक्षण घेत आहे. या चित्रपटात आलिया धकधक गर्ल माधुरी दीक्षितसोबत कथ्थक करणार आहे. या गाण्यात जुन्या गाण्याची झलक पाहायला मिळणार आहे.

‘स्टुडंट ऑ द इयर’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या आलियाने खूप कमी दिवसांत प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. आलियाने पदार्पणानंतर अनेक चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. प्रत्येक चित्रपटातील आलियाच्या भूमिका बघून प्रेक्षकांना तिची चांगली भुरळ पडली आहे. आता लवकरच प्रेक्षकांची लाडकी आलिया ‘कलंक’ आणि ‘ब्रम्हास्त्र’ या दोन चित्रपटात दिसणार आहे. कलंक या सिनेमात ती कथ्थक करताना दिसणार आहे. कथ्थक शिकण्यासाठी सध्या आलिया खूप मेहनत घेत आहे. आलिया ‘ब्रह्मास्त्र’चे चित्रीकरण पार पडल्यानंतर कलंक सिनेमाचं चित्रीकरण सुरू करणार आहे. ‘कलंक’ या चित्रपटात आलिया नव्या अंदाजात दिसणार आहे. या चित्रपटासाठी ती कथ्थकचे प्रशिक्षण घेत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या चित्रपटात आलिया धकधक गर्ल माधुरी दीक्षितसोबत कथ्थक करणार आहे. हे एक जुने क्लासिकल गाणं आहे. या गाण्यात जुन्या गाण्याची झलक पाहायला मिळणार आहे. या गाण्याच्या चित्रीकरणासाठी संपूर्ण टीम आता सज्ज आहे.

kalank
कलंक

सूत्रांच्या माहितीनुसार, आलिया गेल्या एका वर्षापासून कथ्थक नृत्याचे धडे गिरवत आहे. कारण या गाण्यात आलिया बरोबर खुद्द माधुरी दीक्षित आहे. माधुरी दीक्षित कथ्थक नृत्यात निपुण आहे. त्यामुळे गेल्या एक वर्षापासून आलिया कथ्थकचा कसून सराव करत आहे. माधुरी दीक्षित आणि आलियाच्या चाहत्यांना या दोघींना एकत्र नृत्य करताना बघणे एक पर्वणीच ठरणार आहे! त्यामुळे आता ‘कलंक’ या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -