घरमनोरंजनक्वारंटाइनमध्ये आलिया मिस करतेय रणवीरला

क्वारंटाइनमध्ये आलिया मिस करतेय रणवीरला

Subscribe

रणवीरला काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाल्याने क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यामुळे रणवीर आलिया एकमेकांना भेटू शकत नसल्याने आलियाला रणवीरची खूप आठवण येत आहे.

अभिनेता रणवीर कपूरला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. याबद्दलची माहिती रणवीरची आई नीतू कपूर यांनी सोशल मीडियाद्वारे केली होती. त्यामुळे त्याला क्वारंटाइन करण्यात आले होते. यानंतर आलियानेही स्वत: ला क्वारंटाइन केले होते. त्यामुळे या दोघांची भेट होत नसल्याने आलिया रणवीरला खूप मिस करत असल्याचे दिसत आहे. आलियाने नुकतच तिच्या सोशल मीडियावर एक जुना फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत रणवीर आणि आलियाने एकमेकांच्या हातात हात गुंफले आहेत. या फोटोला कॅप्शन देताना, ‘मेजर मिसिं असं म्हणत एका लाल बदामासह तिने हा फोटो पोस्ट केला आहे. यामुळे आलियाला रणवीर ची खूप आठवण येत असल्याचे दिसून येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt ☀️ (@aliaabhatt)

 आलियाने पोस्ट केलेल्या या फोटोला १५ मिनिटांत ५० हजारांहून अधिक लोकांनी पसंती दिली आहे. आलियाने काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या वाढदिवसाच्या पार्टीला हजेरी लावली होती. भन्साळींना सुद्धा कोरोनाची लागण झाल्याचे कळताच आलियाने स्वत: ची कोरोना चाचणी केली. यात आलियाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असून तिने काही दिवस स्वत: ला क्वारंटाइन केले. त्यानंतर आता तिने पुन्हा एकदा शूटिंगला सुरुवात केली आहे. पण रणवीरला मात्र अजूनही क्वारंटाइनच ठेवले आहे त्यामुळे आलिया रणवीरला खूप मिस करत आहे.

- Advertisement -

हे वाचा- बिग बॉस १५ मध्ये दिसणार अर्शी खान

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -