घरमनोरंजनBrahmastra | ब्रह्मास्र चित्रपटाचे शूटिंग झाले पूर्ण; निर्माता करण जोहरने शेअर केला...

Brahmastra | ब्रह्मास्र चित्रपटाचे शूटिंग झाले पूर्ण; निर्माता करण जोहरने शेअर केला व्हिडीओ

Subscribe

करण जोहरने ट्विटरवर (Twitter) शेअर केल्या पोस्ट लिहिलं की, आश्चर्यकारक, रोमांचक, परिश्रम, प्रेम आणि उत्कटतेने भरलेला प्रवास अखेर संपला असून, तुमच्यासाठी 'ब्रह्मास्र' घेऊन येत आहोत.

अभिनेत्री रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचा बहुचर्चित ‘ब्रह्मास्र’ (Brahmastra) चित्रपटाचे प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. खूप दिवस या चित्रपटाची शूटिंग चालू होती. मागील काही दिवसांपूर्वी रणबीर आणि आलिया वाराणसीमध्ये (Varanasi) शूटिंग करताना पाहिले होते. निर्माता करण जोहरने सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे सांगितले की, ‘ब्रह्मास्र’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे.
करण जोहरने ट्विटरवर (Twitter) शेअर केल्या पोस्ट लिहिलं की, आश्चर्यकारक, रोमांचक, परिश्रम, प्रेम आणि उत्कटतेने भरलेला प्रवास अखेर संपला असून, तुमच्यासाठी ‘ब्रह्मास्र’ घेऊन येत आहोत. ‘ब्रह्मास्र’ चा भाग एक -शिवा 9 सप्टेंबर 2022 मध्ये थिएटरमध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या काही भागाचे शूटिंग बाकी होते, ते आता नुकतेच पूर्ण झाले आहे.


‘ब्रह्मास्र’चे शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती देताना आलिया भट्टने तिच्या इन्स्टाग्रामवर फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आणि पोस्टला कॅप्शन देताना म्हणाली की, आम्ही 2018 मध्ये या चित्रपटाच्या शूटिंग सुरुवात केली… आणि आता… ‘ब्रह्मास्र’ भाग 1 चे शूटिंग पूर्ण झाले… लवकरच सिनेमागृहात भेटू…

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

- Advertisement -

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा एकत्र हा पहिला चित्रपट आहे. यामध्ये रणबीर आणि आलियाबरोबर अमिताभ बच्चन, मौनी राय, नागार्जुन अक्किनेनी असे दिग्गज कलाकार या चित्रपटामध्ये दिसणार आहेत. ‘ब्रह्मास्र’ चित्रपट हा हिंदी, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि तमीळ या 5 भाषांमध्ये (Languages) चित्रीकरण करणार आहेत.

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -