घरताज्या घडामोडीRussia Ukraine War: युक्रेन राष्ट्रपती झेलेंस्कींच्या शांती प्रस्तावावर बोलले पुतिन, 'मी त्यांना...

Russia Ukraine War: युक्रेन राष्ट्रपती झेलेंस्कींच्या शांती प्रस्तावावर बोलले पुतिन, ‘मी त्यांना चिरडून टाकेन’

Subscribe

अनेक बैठका दोन्ही देशांमध्ये होऊनही रशिया-युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. अशातच पुतिन यांनी युक्रेनियनला चिरडून टाकण्याची भाषा केली आहे.

रशिया-युक्रेनच्या युद्धाचा (Russia-Ukraine War) आज ३४वा दिवस आहे. परंतु युद्ध काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. युद्ध थांबवण्यासाठी अनेक वेळा दोन्ही देशांमध्ये महत्त्वाची चर्चा झाली. पण तरी युद्ध काही थांबले नाही. यादरम्यान रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन (Russia President Vladimir Putin) यांनी युक्रेनियनला चिरडून टाकण्याची भाषा केली आहे. रशियन व्यापारी रोमन अब्रामोविच (Roman Abramovich) जे युक्रेन आणि रशियामधील अनौपचारिक दूत स्वरुपात काम करत आहेत. त्यांना राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्याकडून सांगण्यात आले की, ‘ते युक्रेनियनला चिरडून टाकतील.’ ब्रिटिश दैनिक द टाईम्सच्या माहितीनुसार, ही घटना तेव्हा घडली जेव्हा अब्रामोविच यांनी युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमिर झेलेंस्की (Ukraine President Volodymyr Zelensky’s) यांनी लिहिलेली एक पत्र पुतिन यांना दिले होते.

टाईम्सच्या एका विशेष रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, रशियाच्या राष्ट्रपतींनी म्हटले की, ‘मी त्यांना चिरडून टाकेन हे त्यांना सांगा.’ दरम्यान अब्रामोविच यांनी २४ फेब्रुवारीला सुरू झालेले युद्ध संपवण्यासाठी चर्चेत युक्रेनची मदत स्वीकारली होती. द टाईम्सनुसार, अब्रामोविच यांचे विमान इस्तांबुलहून मास्कोसाठी रवाना झाले. जिथे त्यांनी पुतिन यांना भेटून युक्रेनच्या राष्ट्रपतीचे पत्र दिले आणि पुन्हा परतले.

- Advertisement -

तर वॉल स्ट्रीट जर्नलने (डब्ल्यूएसजे) सोमवारी लिहिले की, ‘अब्रामोविच आणि युक्रेनच्या शांती संवादकांना कीवमधील एका बैठकीनंतर या महिन्याच्या सुरुवातील विषबाधा झाल्याच्या संशयाच्या खुणा आढळल्या.’ पण युक्रेनियन अधिकाऱ्यांनी हा अहवाल फेटाळला आहे. याबाबत युक्रेनचे संवादक Mykhailo Podolyak म्हणाले की, ‘खूप साऱ्या शक्यता आहेत. विविध षड्यंत्रांचे सिद्धांत आहेत.’ बातचीत करणाऱ्या टीमच्या इतर एक सदस्य Rustem Umerovने लोकांना अशा प्रकारच्या बातम्यांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. एका अमेरिकन अधिकाऱ्याने ही बातमी फेटाळत म्हटले की, ‘पर्यावरणीय कारणामुळे अब्रामोविच आणि संवादक आजारी पडले आहेत.’


हेही वाचा – इमरान खान यांच्याविरोधात अविश्वास ठराव

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -