घरमनोरंजन'आम्ही बेफिकर' चा ट्रेलर आऊट

‘आम्ही बेफिकर’ चा ट्रेलर आऊट

Subscribe

उत्तम कलाकारांसह, उत्कृष्ट कथा, महाविद्यालयीन आठवणीत रममाण करणारे संवाद आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम असलेला 'आम्ही बेफिकर' हा चित्रपट ८ मार्च रोजी हा प्रेक्षकांच्या भेटीस

मराठी चित्रपटाच्या माध्यमातून नवनवीन फ्रेश जोड्या प्रेक्षकांसमोर येतात. त्यापैकी काही जोड्या अल्पावधीत प्रचंड लोकप्रियही होतात. ‘आम्ही बेफिकर’ या चित्रपटातून सुयोग गोऱ्हे आणि मिताली मयेकर प्रेक्षकांसमोर येणार असल्याची चर्चा सुरू होती. याच चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉच झाला आहे. महाविद्यालयातील पाच वर्ष हे अगदी मजेशीर असतात. धम्माल मस्ती-मजा, मित्र-मैत्रिणी, राडे आणि प्रेम याचा प्रत्यय हा महाविद्यालयात शिकत असतांना सगळ्यांना येत असतो. हा सर्व माहोल आणि कॉलेजचं हे जग ‘आम्ही बेफिकर’ या चित्रपटातून पुन्हा एकदा पडद्यावर अनुभवता येणार आहे. म्हणूनच हा चित्रपट प्रत्येकाला आपल्या महाविद्यालयाच्या भावविश्वात रममाण करणारा असेल हे नक्की.

- Advertisement -

 फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला

‘आम्ही बेफिकर’ या चित्रपटाची निर्मिती हरिहर फिल्म्सच्या नारेश मिश्रा, अंतरिक्ष चौधरी, कविश्र्वर मराठे आणि रोहित चव्हण यांनी केलेली आहे. कविश्वर मराठे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. सुयोग गोऱ्हे आणि मिताली मयेकर ही नवी जोडी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हे कलाकार अनेक चित्रपट, मालिकेतून आपल्यासमोर आले आहेत. मात्र ‘आम्ही बेफिकर’ या चित्रपटातून पहिल्यांदाच ही जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे. या जोडीसोबत राहुल पाटील, स्वप्नील काळे आणि अक्षय हे कलाकारसुद्धा प्रमुख भूमिकेमध्ये दिसणार आहेत. या चित्रपटाला प्रणय अढांगळे यांनी संगीतबद्ध केले असून रोहित राऊत, हर्षवर्धन वावरे, कीर्ती किल्लेदार आणि सौरभ जोशी यांच्या मधुर आवाजात चित्रपटातील गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहेत.

८ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस

आजच्या तरूणाईला सादर करणारा, तरुणांशी संवाद साधणारा आणि त्यांच्या मनातील विचार पडद्यावर मांडणारी या चित्रपटाची कथा आहे. त्यामुळेच हा चित्रपटाचा संपूर्ण यूथफुल असल्याचं आपल्याला ‘आम्ही बेफिकर’च्या ट्रेलरमधून पहायला मिळतं. उत्तम कलाकारांसह, उत्कृष्ट कथा, महाविद्यालयीन आठवणीत रममाण करणारे संवाद आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम असलेला ‘आम्ही बेफिकर’ हा चित्रपट ८ मार्च रोजी हा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -