घरमहाराष्ट्रनाशिक आणि औरंगाबाद म्हाडाची लॉटरी जाहीर

नाशिक आणि औरंगाबाद म्हाडाची लॉटरी जाहीर

Subscribe

नाशिकमध्ये १११३ तर औरंगाबादमध्ये ९१७ घरांची लॉटरी जाहीर झाली आहे. या लॉटरीसाठी अर्जदारांची नोंदणी, ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचा शुभारंभ झाला आहे.

नाशिक आणि औरंगाबादमध्ये म्हाडाची लॉटरी जाहीर झाली आहे. नाशिकमध्ये १११३ तर औरंगाबादमध्ये ९१७ घरांची लॉटरी जाहीर झाली आहे. या लॉटरीसाठी अर्जदारांची नोंदणी, ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचा शुभारंभ झाला आहे. म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांच्या हस्ते या लॉटरीच्या ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला शुभारंभ झाला आहे. नाशिक आणि औरंगाबाद मंडळाच्या कार्यालयात झालेल्या दोन वेगवेगळ्या कार्यक्रमात हा शुभारंभ करण्यात आला.

नेमकं काय म्हणाले उदय सामंत?

उदय सामंत म्हणाले की, ‘म्हाडाची ऑनलाईन लॉटरी ही संपूर्णपणे पारदर्शक आहे. या लॉटरीच्या निमित्ताने उपलब्ध करून दिलेल्या संधीचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घेऊन गृहस्वप्नपूर्ती करावी. नाशिक आणि औरंगाबाद मंडळांतर्गत उभारण्यात आलेल्या सदनिकांच्या संगणकीय सोडतींकरिता माहितीपुस्तिका आणिऑनलाईन अर्ज म्हाडाच्या htpps://lottery.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.’ दोन्ही मंडळांच्या सोडतीकरिता उत्पन्न मर्यादा शिथिल करण्यात आली असून एक युजर आय डी वापरून अर्जदार एका पेक्षा जास्त सदनिकांसाठी अर्ज करू शकतो, अशी माहितीही सामंत यांनी यावेळी दिली.

- Advertisement -

नाशिक : २७ फेब्रुवारी ते २२ मार्चपर्यंत करा नोंदनी

म्हाडाच्या नाशिक मंडळाने दिलेल्या मागहितीनुसार, अर्जदाराला २७ फेब्रुवारी २०१९ च्या दुपारी दोन वाजेपासून २२ मार्च २०१९ रात्री ११ वाजून ५९ मिनिटापर्यंत ऑनलाईन नोंदनी करता येणार आहे. त्याचबरोबर याच कालावधीत नोंदणीकृत अर्जदारांना अर्ज सादर करता येणार आहे. नोंदणीकृत अर्जदारांना  २७ फेब्रुवारी २०१९  ते २४ मार्च २०१९  या कालावधीत  एनईएफटी / आरटीजीएसद्वारे अनामत रक्कम भरता येणार आहे. दि. २७ फेब्रुवारी २०१९ दुपारी २ वाजेपासून २४ मार्च २०१९ रात्री ११.५९ वाजेपर्यंत  डेबिट, क्रेडिट कार्ड तसेच इंटरनेट बँकिंगद्वारे अनामत रक्कम भरता येणार आहे. नाशिक मंडळाच्या लॉटरीमध्ये आडगाव-म्हसरूळ लिंक रोड (नाशिक), श्रीरामपूर (जि. अहमदनगर), पंचक (नाशिक), डॉ. वसंत पवार मेडिकल कॉलेजजवळ आडगाव (नाशिक), जी. डी. सावंत कॉलेज समोर, पाथर्डी शिवार (नाशिक), साईबाबा मंदिराजवळ, पाथर्डी शिवार (नाशिक), मखमलाबाद (नाशिक), चाळीसगाव रोड-धुळे  येथील सदनिकांचा समावेश आहे.

औरंगाबाद : २७ फेब्रुवारी ते २७ मार्चपर्यंत करा नोंदनी

म्हाडाच्या औरंगाबाद मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, अर्जदाराला २७ फेब्रुवारी २०१९ च्या दुपारी बारा वाजेपासून २७ मार्च २०१९ सायंकाळी पाच वाजेपर्यंत ऑनलाईन नोंदनी करता येणार आहे. त्याचबरोबर याच कालावधीत नोंदणीकृत अर्जदारांना अर्ज सादर करता येणार आहे. नोंदणीकृत अर्जदारांना  अर्ज सादर करण्यासाठी २८ फेब्रुवारी २०१९ रोजी दुपारी १२ वाजेपासून ते २७ मार्च २०१९ रात्री ११ वाजून ५९ मिनिटापर्यंत मुदत देण्यात आली आहे. नोंदणीकृत अर्जदारांना २८ फेब्रुवारी २०१९  ते २८ मार्च २०१९ या कालावधीतएनईएफटी / आरटीजीएसद्वारे अनामत रक्कम भरता येणार आहे. २८ फेब्रुवारी २०१९ दुपारी १२ वाजेपासून २७ मार्च २०१९ रात्री ११.५९ वाजेपर्यंत  डेबिट, क्रेडिट कार्ड तसेच इंटरनेट बँकिंगद्वारे अनामत रक्कम भरता येणार आहे. औरंगाबाद मंडळाच्या यंदाच्या लॉटरीत देवळाई (औरंगाबाद),  एमआयडीसी पैठण,  एमआयडीसी वाळूज, तिसगाव येथील सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. औरंगाबाद मंडळाच्या यंदाच्या सोडतीत देवळाई (औरंगाबाद),  एमआयडीसी पैठण,  एमआयडीसी वाळूज, तिसगाव येथील सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -