घरमनोरंजनआमिर खान अखेर बोलला

आमिर खान अखेर बोलला

Subscribe

अमिताभ बच्चन, आमिर खान यासारखे दिग्गज कलाकार ‘ठग्स् ऑफ हिंदुस्थान’ या चित्रपटात आहेत म्हटल्यानंतर छान मनोरंजन करू शकेल असं काही या चित्रपटात असेल या एका इच्छेने त्यांचे चाहते चित्रपट पहायला गेले आणि निराश होऊन बाहेर पडले. एका रात्री सोशल नेटवर्कवर व्यक्त केलेली निराशा इतकी घातक ठरली की अपयशाबद्दल अमिताभ, आमिर काहीच बोलायला मागत नव्हते. पण आता मात्र आमिरने प्रतिक्रिया दिलेली आहे. निमित्त काय तर सोनी मॅक्सवर हा चित्रपट दाखवला जाणार आहे.

मी पहिल्यांदा कथा ऐकली. त्यातल्या फिरंगीची भूमिका मला इतकी आवडली की मी लागलीच चित्रपटात काम करण्यासाठी होकार दिला. हा फिरंगी प्रत्येकाला खोटे ठरवत असतो. त्याच्यातला विलक्षणपणा मला भावला. ही प्रतिक्रिया आहे खुद्द आमिर खानची. विजयकृष्ण आचार्य यांनी या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन केलेले आहे. हा चित्रपट भव्यदिव्य, आकर्षक व्हावा यादृष्टीने थायलंड, जोधपूर, माल्टा या नयनरम्य ठिकाणी या चित्रपटाचे चित्रीकरण केले आहे. कतरिना कैफ, फातिमा शेख यांचाही यात कलाकार म्हणून सहभाग आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -