घरमनोरंजनआयुष्याचं बॅकअप ठेवणं मात्र अशक्य आहे! - अमिताभ बच्चन

आयुष्याचं बॅकअप ठेवणं मात्र अशक्य आहे! – अमिताभ बच्चन

Subscribe

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांसमोर फार हळवं वक्तव्य केलं आहे. मोबाईल फोनच्या बॅकअप सारखं आयुष्याचे बॅकअप ठेवणं फार अवघड आणि अशक्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आज फार हळवं आणि एक संवेदनशील वक्तव्य ट्विटरमार्फत केलं आहे. त्यांच्या या गहन वक्तव्याने कित्येक चाहत्यांचे ठोके धडधडायला लागले आहेत. त्याचं झालं असं की, अमिताभ बच्चन यांचा सॅमसंग गॅलक्सी s9 या मोबाईलमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे हा मोबाईल कसा सुदारावा, यासाठी अमिताभ यांनी थेट आपल्या चाहत्यांची मदत मागितली. काही काळाने त्यांचा मोबाईल सुधारण्याची जबाबदारी सॅमसंग कंपनीने घेतल्यानंतर त्यांनी याबाबत आपल्या चाहत्यांना माहिती देताना आयुष्यासी संबंधित एक मोठी गोष्ट सांगितली. ते म्हणाले की, टेक्नॉलॉजी आपल्याला बॅकअप ठेवायला मजबूर करतं पण आयुष्याचे बॅकअप ठेवणं अशक्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अमिताभ यांचे पहिले ट्विट

अमिताभ यांनी आपल्या पहिल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, ‘T 3024 मदत करा! सॅमसंग S9 बरोबर काम करत नाही. सॅमसंगचा लोगो दिसत आहे परंतु, स्क्रीन सारखी-सारखी ब्लिंक होत आहे. त्याशिवाय काही सुद्धा होत नाहीये. बंद करण्याचा प्रयत्न केला तर फोन बंद देखील होत नाहीये…मदत करा..कृपया मला सांगा यासाठी मला काय करायला हवे…’

- Advertisement -


यानंतर जगभरातील त्यांच्या चाहत्यांनी वेगवेगळे सल्ले दिले. सल्ले देणाऱ्यांची तर मोठी रांगच लागली. विशेष म्हणजे अमिताभ यांच्या या ट्विटवर शाओमी या मोबाईल कंपनीच्या एमडी मनु कुमार जैन यांनी तर त्यांना मोबाईल बदलण्याचा सल्ला दिला. त्यांनी रिट्विट करत सांगितले की, आता फोन बदलण्याची वेळ आली आहे. शिवाय, आपल्याला फ्लॉगशिप फोन देण्यात आम्हाला आनंद होईल.

- Advertisement -

अमिताभ यांचे दुसरे ट्विट

चाहत्यांचे सल्ले देणे सुरु असतानाच अमिताभ यांनी पुन्हा एक ट्विट केले. आपण ट्विट केल्यानंतर सॅमसंग कंपनीने मोबाईल फोन सुधारण्यासाठी मदत केली असल्याचे ते म्हणाले. या सगळ्यांबरोबरच अमिताभ यांनी मनाला चटका लावून देणारी गोष्ट सांगून गेले. ते म्हणाले की, टेक्नॉलॉजी आपल्याला बॅकअप ठेवायला मजबूर करतं पण आयुष्याचे बॅकअप ठेवणं अशक्य आहे.


हेही वाचा – अमिताभ बच्चन यांनी फेडले उत्तर प्रदेशातील १३९८ शेतकऱ्यांचे कर्ज

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -