Amitabh Bachchan Health: बिग बींची प्रकृती बिघडली, चाहत्यांना मोठा धक्का

'मेडिकल कंडिशन, शस्रक्रिया, मी लिहू शकत नाही', अशी एक पोस्ट बिग बींनी त्यांच्या ब्लॉग पोस्टवर केली आहे.

amitabh bachchan shared a blog about medical condition and surgery informed
Amitabh Bachchan Health: बीग बींची प्रकृती बिघडली, चाहत्यांना मोठा धक्का

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते महानायक अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांचे अनेक फोटो, रोजच्या घडामोडी ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. मात्र अमिताभ बच्चन यांनी केलेल्या एका ब्लॉगमुळे संपूर्ण बॉलिवूडला आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमार्फत त्यांची प्रकृती बिघडली असल्याचे सांगितले आहे. त्यांच्यावर शस्रक्रिया करण्यात येणार असल्याचे त्यांच्या ब्लॉगमधून स्पष्ट होत आहे. या ब्लॉग पोस्टमुळे बिग बींच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ‘मेडिकल कंडिशन, शस्रक्रिया, मी लिहू शकत नाही’, अशी एक पोस्ट बिग बींनी त्यांच्या ब्लॉग पोस्टवर केली आहे. शस्रक्रिया कशाची आहे, बिग बींना काय झाले हे अद्याप समजू शकले नाहीय.

अमिताभ बच्चन यांच्या या पोस्ट नंतर त्यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे. बिग बींनी काल एक ट्विटही केले होते त्यात त्यांनी असे म्हटले होते की, ‘काही गोष्टी गरजेपेक्षा जास्त वाढल्या आहेत. काही कापल्यानंतर सुधारणा होईल. आयुष्यातील उद्यासाठी हे आहे. उद्याच समजेल की हे कसं काय होईल’, असे ट्विट बिग बींनी केले आहे. त्यांच्या या ट्विटनंतर चाहत्यांना त्यांनी बुचकळ्यात पाडले आहे. त्यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत कोणतही ठोस माहिती दिलेली नाही मात्र बीग बींच्या लाखो चाहत्यांनी त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे.

नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड हा सिनेमा येत्या १८ जूनला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात बिग बी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. अमिताभ बच्चन यांनी स्वत: सिनेमाचे पोस्टर शेअर केले होते. या सिनेमात बिग बी एका क्रिडा प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत.


हेही वाचा – कंगना प्रकरणी ऋतिक रोशनची पोलिसांकडून अडीच तास चौकशी