घरमनोरंजनकंगना प्रकरणी ऋतिक रोशनची पोलिसांकडून अडीच तास चौकशी

कंगना प्रकरणी ऋतिक रोशनची पोलिसांकडून अडीच तास चौकशी

Subscribe

मुंबई क्राईम ब्रांचकडून बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशनला कंगना प्रकरणी नोटीस बजावण्यात आली होती. या नोटीसीला उत्तर देत ऋतिक रोशन आज मुंबई क्राईम ब्रांच कार्यालयात हजर झाला आहे. जवळपास दोन ते अडीच तास मुंबई क्राईम ब्राँचने ऋतिकची कसून चौकशी केली. याप्रकरणातील काही महत्त्वाचे पुरावे ऋतिकने पोलिसांच्या हाती सोपावली.
आज सकाळी ११.४५ च्या सुमारास ऋतिक मुंबई क्राईम ब्राँचच्या कार्यलयात हजर झाला तो दुपारी २.२० च्या सुमारास बाहेर पडला. यावेळी त्याचे वकीलहीसोबत होते. ऋतिक रोशन (Hritik Roshan) आणि  कंगना रानौत एकमेकांचे चांगेल मित्र होते मात्र काही कारणास्तव दोघांमध्ये वाद झाले. हे वाद इतके टोकाला गेले की दोघांनी माध्यमांसमोरही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणे सुरु ठेवले होते. २०१६ मध्ये ऋतिक आपल्याला इमेल पाठवत सतत त्रास देत असल्याचा आरोप कंगनाकडून करण्यात आला. मात्र ऋतिकने आपण कोणतेही इमेल पाठवत नसल्याचे सांगून आरोप फेटाळून लावले. याप्रकरणानंतर ऋतिकने मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडे कंगना विरोधात तक्रार दाखल केली. मात्र ही केस सायबर सेलने सीआययुकडे वर्ग करण्यात आली. या तक्रारीला सीआययुकडे वर्ग करण्यात आल्यानंतर पुन्हा या प्रकरणात वेगाने तपास सुरु झाला आहे. याचप्रकरणात ऋतिकला नोटीस पाठवून जबाब नोंदवण्यासाठी बोलवण्यात आले होते.

- Advertisement -

ऋतिक- कंगनाचा हा वाद अनेकदा चर्चेत आला. यावेळी दोघांना एकमेकांना अनेक कायदेशीर नोटीस पाठवल्या. याप्रकरणात आता कंगनाही मुंबई पोलिसांकडून अधिकृत नोटीस पाठवली जाऊ शकते. या प्रकरणादरम्यान २०१३-१४ ऋतिक रोशनच्या ईमेल आयडीवर शेकडो मेल आले होते. याप्रकरणीच्या चौकशीसाठी डिसेंबर २०२० मध्ये वकील महेश जेठमलानी यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना नोटीस पाठवली होती. मात्र याची चौकशी झाली नाही. यानंतर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी हे प्रकरण सायबर सेलच्या CIUकडे वर्ग केले. कंगनाने ऋतिकवर आरोप केले होते की, ऋतिकसोबत माझे रिलेशनशिप होते आम्ही लग्नही करणार होतो, मात्र ऋतिकने लग्नाला नंतर नकार दिला. यादरम्यान दोघांनी एकमेकांवर तीव्र शब्दात आरोप- प्रत्योरोप केले. अनेक कायदेशीर नोटीसही पाठवल्या होत्या.


हेही वाचा- अनुराग कश्यपची लेक आलिया ट्रोलर्सची शिकार

 

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -