घरमनोरंजनआनंदचं 'हे' सरप्राईज सोनमसाठी ठरलं स्पेशल!

आनंदचं ‘हे’ सरप्राईज सोनमसाठी ठरलं स्पेशल!

Subscribe

बॉलिवूड अभीनेत्री सोनमने लग्नानंतर आपल्या नावात बदल केला. सोनम कपूरची सोनम के. आहुजा झाली. तिच्या या नाव बदलण्यावरून सोशल मीडियावर तिला खूप ट्रोल करण्यात आलं होतं. पण सोनमनंतर आता तिच्या पतीने म्हणजेच आनंदनेसुद्धा आपल्या नावात बदल केला आहे. सोनम ट्रोल होत असतानाच आनंदने त्याच्या नावात केलेला बदल हा एकप्रकारे सोनमला ट्रोल करणाऱ्यांना उत्तरच आहे.
बॉलिवूड अभनेत्री सोनम कपूरचं ८ मे रोजी तिचा बॉयफ्रेंड आनंद आहुजासोबत नुकतंच लग्न झालं. यादरम्यान तिच्या लग्न समारंभाच्या सेटपासून तर सोनमच्या मेहंदी, संगीत समारंभ, तिने घातलेले कपडे, लग्नात कुणी-कुणी हजेरी लावली, अशा तिच्या लग्नातील अगदी बारीक-सारिक गोष्टींवर चर्चा सुरु होती. मात्र लग्न झाले तरीही सोनमबाबत चर्चा संपलेली नाही. लग्न झाल्यानंतरही सोनम चर्चेत आहे आणि ती तिच्या पतीने म्हणजेच आनंदने आपल्या नावात केलेल्या बदलामुळे!
आनंद आहुजाने नुकतेच इन्स्टाग्रामवर आपले नाव आनंद आहुजाचे आता आनंद एस आहुजा असे केले आहे. विशेष म्हणजे या नावातील बदलाची सोनमला काहीच माहिती नव्हती. त्यामुळे आनंदचं हे सरप्राईज सोनमसाठी स्पेशल ठरलं आहे!
आनंदच्या या नाव बदलण्यावर सोनम म्हणाली कि, ‘आनंदने त्याच्या नावात केलेला हा बदल तिच्यासाठी खुप सुखद तर आहेच, सोबतच इतरांसाठी खूप प्रेरणादायीसुद्धा आहे. आनंद हा इतरांपेक्षा खूप वेगळ्या विचारसरणीचा आहे. आणि त्याची हीच गोष्ट मला खूप आवडली.’
सद्ध्या सोनम ‘वीरे दी वेडिंग’चा प्रमोशन करण्यात व्यस्त आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -