घरमनोरंजनभाजप-सेनेचं ठरत नाही, अनिल कपूरला मुख्यमंत्री करा; अनिल कपूरने दिला भन्नाट रिप्लाय

भाजप-सेनेचं ठरत नाही, अनिल कपूरला मुख्यमंत्री करा; अनिल कपूरने दिला भन्नाट रिप्लाय

Subscribe

सध्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असावा? हे अद्याप ठरत नसल्याने या भाजप-सेनेला पडलेल्या पेच प्रसंगावेळी लोकांना तसेच अनिल कपूरच्या चाहत्यांना मात्र नायक चित्रपटातील अनिल कपूरची आली आठवण

बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरचा २००१ साली प्रदर्शित झालेला नायक हा चित्रपट तुम्हाला आठवतच असेल. या चित्रपटामध्ये अनिल कपूर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले होते. नायक चित्रपटामध्ये केलेली मुख्यमंत्र्याची भूमिका ही त्यांच्या करिअर मधील सर्वोत्तम भूमिकांपैकी एक होती. ही अनिल कपूरची भूमिका प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहे. सध्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असावा? हे अद्याप ठरत नसल्याने या भाजप-सेनेला पडलेल्या पेच प्रसंगावेळी लोकांना तसेच अनिल कपूरच्या चाहत्यांना मात्र नायक चित्रपटातील अनिल कपूरची आठवण आली आहे.

विजय गुप्ता नावाच्या एका चाहत्याने ट्विट करत अशी मागणी केली आहे की, जर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरत नसेल तर अनिल कपूरला मुख्यमंत्री बनवा. यावर अनिल कपूरने देखील भन्नाट रिप्लाय दिला आहे. या चाहत्याने देवेंद्र फडणवीस, आदित्य ठाकरे आणि अनिल कपूर यांना टॅग करत ट्विट केले आहे.

- Advertisement -

असे या ट्विटमध्ये लिहिले आहे. ‘महाराष्ट्र में जब तक कोई रास्ता नहीं निकलता तब तक @AnilKapoor को ही मुख्यमंत्री बना कर देख लेते हैं। पर्दे पर उनके एक दिन का कार्यकाल पूरे देश ने देखा और सराहा है। @Dev_Fadnavis और @AUThackeray क्या सोच रहे हैं ??’

- Advertisement -

या विजय गुप्ता नावाच्या चाहत्याच्या या ट्विटला रिट्विट करत अनिल कपूरने ‘नहीं मैं नायक ही ठीक हूं’। असा रिप्लाय दिला आहे.

अनिल कपूरला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करावं, या कल्पनेला अनेकांनी सहमत दर्शवली आहे. अनिल कपूरच्या चाहत्यांनी या सोशल मीडियावर आलेल्य़ा प्रस्तावाला मान्यता दिली असून खूप मजेदार कमेंट या पोस्टवर मिळताना दिसताय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -