कोलकात्यात आणखी एक मॉडेलची आत्महत्या; दोन आठवड्यात चौथ्या मॉडेलचा मृत्यू

या अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, सरस्वतीचे इतर तीन मॉडेल मंजुषा नियोगी, बिदिशा डी मजुमदार किंवा टेलिव्हिजन अभिनेत्री पल्लबी डे यांच्याशी काही संबंध आहेत का हे शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. कारण पेशाने मॉडेल असलेल्या या सर्वांचा मृत्यू संशयास्पद आत्महत्येमुळे झाला होता.

another kolkata model found dead fourth in 2 weeks marathi
कोलकत्यात आणखी एक मॉडेलची गळफास घेत आत्महत्या; दोन आठवड्यात चौथ्या मॉडेलचा मृत्यू

कोलकत्यामध्ये मॉडेलच्या आत्महत्यांचे सत्र सत्र सुरुच आहे. गेल्या पंधरा दिवसांत आत्महत्येची ही चौथी घटना आहे. कोलकत्यात गेल्या काही दिवसांत 3 मॉडेल्सचे मृतदेह त्यांच्या राहत्या घरात आढळून आले, यात आता पुन्हा एका मॉडेलने आत्महत्या केल्याची घटना घडली, रविवारी सकाळी एका 18 वर्षीय मॉडेलने राहत्या घरी आत्महत्या केली. सरस्वती दास (Saraswati Das Suicide) असे या मृत मॉडेलचे नाव आहे. पेशाने ती मॉडेलसह एक मेकअप आर्टिस्ट देखील होती. (Kolkata Model)

दरम्यान रविवारी सकाळी तिने कोलकात्यातील कसबा भागातील बेदियाडंगा येथील राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला. अनेक छोट्या कार्यक्रमांमध्ये ती मॉडेलिंग करत होती. तिला मॉडेलिंगसाठी अनेक ऑफर देखील येत होत्या. मात्र शनिवारी अचानक तिने राहत्या घरात ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला.

पोलिसांनी सांगितले की, “हे आत्महत्येचे प्रकरण आहे असे दिसते, परंतु आपण या प्रकरणाकडे प्रत्येक बाजूने पाहणे आवश्यक आहे. सरस्वतीच्या आजीने प्रथम तिला फासावर लटकवलेल्या अवस्थेत पाहिले, यावेळी भाजीपाला कापण्याच्या कटरने दोरी कापून खाली तिला खाली उतरवले आणि उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. सध्या आम्ही पोस्टमार्टम रिपोर्टची वाट पाहत आहोत. (4th model found dead in kolkata)

“शनिवारी रात्री तिची आई आणि मावशी कामावर गेल्यानंतर संबंधी मॉडेलने गळफास घेतल्याचे दिसते. पोलिसांनी तिचा मोबाईल फोन जप्त असून तिचा सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मची कसून चौकशी करत” असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

या अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, सरस्वतीचे इतर तीन मॉडेल मंजुषा नियोगी, बिदिशा डी मजुमदार किंवा टेलिव्हिजन अभिनेत्री पल्लवी डे यांच्याशी काही संबंध आहेत का हे शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. कारण पेशाने मॉडेल असलेल्या या सर्वांचा मृत्यू संशयास्पद आत्महत्येमुळे झाला होता. (crime in kolkata)

सरस्वतीचे वडिलांनी लहानपणीच तिच्या कुटुंबापासून वेगळे झाले. त्यामुळे लहानपणापासून आई आणितिच्या काकूंनी तिचे संगोपन केले. गेल्या आठवड्यात बुधवारी मॉडेल बिदिशा मुजुमदार हिने आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली होती. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी मॉडेल मंजुषा (२६) तिच्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडली होती. मंजुषाच्या आईने सांगितले की, बुधवारी तिची मैत्रिण आणि सहकारी बिदिशा डी मजुमदारच्या संशयास्पद आत्महत्येने ती अस्वस्थ झाली होती. त्याचवेळी पल्लवी डे हीने देखील 15 मे रोजी गरफा येथील तिच्या भाड्याच्या खोलीत आत्महत्या केली.


UPSC 2021 Final Result : यंदाच्या युपीएससी परीक्षेत मुलींची बाजी; श्रुती शर्मा देशात पहिली