घरमनोरंजनअंशुमनचे सलाम करणारे काम

अंशुमनचे सलाम करणारे काम

Subscribe

कलाकार भेटला की आता नवीन काय चाललंयअसा प्रश्न आवर्जून विचारला जातो. अर्थात जो कलाकार सातत्याने वेगळे काही करत असतो. त्याच्यासाठी हा प्रश्नअसतो. नाविन्याचा ध्यास घेतलेले हाताच्या बोटावर मोजता येतील असे जे कलाकार आहेत त्यात अंशुमन विचारे हा एक आहे. त्याचा दोन दशकातला यशस्वी प्रवास लक्षात घेतला तर प्रत्येक टप्प्यावर नोंद घ्यावी, अशी अनमोल कामगिरी त्याने केलेली आहे. खरं तर तो नाट्यक्षेत्रात आला तो केवळ अभिनेता होण्यासाठीच. धीरगंभीर, भावनिक अशा भूमिका तो मोठ्या आत्मविश्वासाने करतो. रुपेरी पडद्यांनी नेहमीच त्याच्या या वेगळ्या अभिनयाची दखल घेतलेली आहे. रंगमंचासाठी मात्र तो नेहमीच विनोदी कलाकार राहिलेला आहे. ‘फु बाई फू’ या रियालिटी शोमुळे तो विनोदी अभिनेता असल्याचे महाराष्ट्राला कळून चुकलेले आहे. या एका गुणावरती तो आपली यशस्वी कारकीर्द करु शकला असता. पण नाविन्याचा ध्यास ही त्याच्या व्यक्तिमत्वाची बाजू आहे.

यात त्यांनी नाटकाची निर्मिती केली, वेगळ्या भूमिका हाताळल्या, आवश्यक तेथे किस्से सांगणारे एकपात्री प्रयोगही केले. मधल्या काळामध्ये त्याने एक धाडस केले. ते म्हणजे आपल्यामध्ये सुरेल आवाज दडलेला आहे. हे ही दाखवणे त्याने सुरू केलेले आहे. तब्बल दोन ते अडीच तास प्रेक्षकांचे गाण्याच्या माध्यमातून मनोरंजन करु शकेल. इतकी गाणी त्याने तोंडपाठ केलेली आहेत. आता या अंशुमनला नवीन काय विचारल्यानंतर त्याने नवकलाकारांना अभिनयाचे धडे देण्याचे सुरू केलेले आहे. अंशुमन विचारे अ‍ॅक्टिंग अकॅडमी स्थापन करुन त्यात 100 टक्केे कामाची तो हमी देतो. आता सामाजिक बांधिलकी म्हणून तळागाळातल्या, कष्टकरी, समाजहीत काम करणार्‍या व्यक्तींना पुरस्कार देण्याचे ठरवले आहे. त्यासाठी त्यांनी स्वत:हून 11 हजारांचा पुरस्कारही जाहीर केलेला आहे. यात सुद्धा एक संकल्पना दडलेली आहे ती म्हणजे, असामान्य कर्तृत्वाला सलाम असा त्याचा पूर्ण अर्थ आहे. पुढल्या महिन्याच्या फेब्रुवारीत ते प्रत्यक्ष रंगमंचावर दिसायला लागेल. नोंद घ्यावी अशा कर्तृत्ववान व्यक्तींनी 14 जानेवारीच्या आत निवेदन देण्याचे आवाहन केलेले आहे. अधिक माहितीसाठी 8369510046 या क्रमांकासाठी संपर्क साधता येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -