घरमनोरंजन#अनुराग कश्यप आतंकी हैं! ट्विटरवर आहे ट्रेंडिंग कारण...

#अनुराग कश्यप आतंकी हैं! ट्विटरवर आहे ट्रेंडिंग कारण…

Subscribe

सध्या ट्विटरवर अनुराग कश्यप हा हॅश टॅग ट्रेण्ड होत आहे. #अनुराग कश्यप आतंकी हैं हे ट्रेंड सध्या ट्विटरवर जोरदार सुरू आहे. याच कारण म्हणजे अनुराग कश्यप यांनी केलेले पंतप्रधान आणि अमित शहा यांच्या विरोधात केलेल ट्वीट. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयात (JNU)रविवारी झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर देशभरातून रोष व्यक्त केला जात आहे. विद्यार्थ्यांवर झालेल्या या प्राणघातक हल्ल्याचे मुंबई, पुण्यासह देशाच्या विविध भागात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. दरम्यान प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप याने सर्वांना शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याची विनंती केली आहे.

- Advertisement -

अनुराग कश्यप यांनी ट्विटरवर गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अतंकवादी म्हटलं आहे. त्याचबरोबर त्यांनी आपल्या ट्विटरच्या प्रोफाईल फोटोत अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचे तोंडाला रूमाल बांधलेले आणि हातात काठ्या घेतल्या आहेत. या फोटोमुळे आणि ट्वीटमुळे सध्या नेटकऱ्यांनी #अनुराग कश्यप आतंकी हैं हा हॅश टॅग ट्रेण्ड होत आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -