घरताज्या घडामोडीअखेर Anurag Kashyap ला मुंबई पोलिसांचं समन्स, पायल घोषच्या तक्रारीवर कारवाई!

अखेर Anurag Kashyap ला मुंबई पोलिसांचं समन्स, पायल घोषच्या तक्रारीवर कारवाई!

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवुड अभिनेत्री पायल घोष (Actress Payal Ghosh) ने केलेल्या तक्रारीची मोठी चर्चा मुंबईच्या मनोरंजन वर्तुळात होत आहे. पायल घोषनं दिग्दर्शक अनुराग कश्यपवर विनयभंग आणि अत्याचाराचे आरोप केले आहेत. यासंदर्भात पायल घोषनं मुंबई पोलिसांकडे तक्रार देखील केली होती. मात्र तक्रारीनंतर देखील कारवाई होत नसल्याचा दावा तिने केल्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी तिची भेट घेतली. तसेच, पायलनं मंगळवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन आपली व्यथा त्यांच्यासमोर मांडली होती. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अखेर मुंबई पोलिसांनी अनुराग कश्यपला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले आहेत. त्यामुळे आता गेल्या वर्षी गाजलेल्या तनुश्री दत्ता वि. नाना पाटेकर प्रकरणाप्रमाणेच आता पायल घोष वि. अनुराग कश्यप हे प्रकरण देखील तापण्याची शक्यता आहे. अनुराग कश्यपला गुरुवारी सकाळी ११ वाजता वर्सोवा पोलीस स्थानकात चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.

काय म्हटलंय पायलनं FIR मध्ये?

कंगना रनौत प्रकरण (Kangana Ranaut) बॉलिवुडमध्ये जोर धरत असतानाच पायल घोषनं अनुराग विरोधात तक्रार करून गोंधळ उडवून दिला होता. अर्थात, अनुराग कश्यपनं पायलचे सर्व आरोप फेटाळून लावले असून त्याला बॉलिवुडमधील कलकी कोएचलीन, तापसी पन्नू अशा अभिनेत्रींनी पाठिंबा देखील दिला आहे. पायलनं दाखल केलेल्या तक्रारीनुसार, अनुराग कश्यपनं २०१४मध्ये पायलवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच, FIR मध्ये गैरव्यवहार, चुकीच्या हेतूने अडवणूक आणि महिलेच्या शीलाचा अपमान करणारं वर्तन केल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे.

- Advertisement -

अनुराग कश्यपची आधीची पत्नी कल्की कोएचलीननं या प्रकरणात अनुरागला पाठिंबा देताना सोशल मीडियाची मदत घेतली आहे. तर तापसी पन्नूने देखील अनुरागसाठी आवाज उठवला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -