घरमनोरंजनCBD ऑईलला कायद्याने मान्यता द्या, इरफान खानच्या पत्नीची अजब मागणी

CBD ऑईलला कायद्याने मान्यता द्या, इरफान खानच्या पत्नीची अजब मागणी

Subscribe

बॉलीवूड सध्या त्यांच्या ड्रग्ज कनेक्शनमुळे चांगलेच चर्चेत आले आहे. अनेक कलाकारांची नावे ड्रग्ज प्रकरणी समोर आली असून अशा वातावरणात दिवंगत अभिनेता इरफान खान याच्या पत्नीने वेगळीच मागणी केली आहे. इरफान यांची पत्नी सुतापा यांनी भारतात सीबीडी ऑईल (एक प्रकारचे ड्रग) अधिकृत करण्याची मागणी केली आहे. सुतापाने यासंबंधीची पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली असून सोबत लंडनमधील एका इरफान खान कर्करोगावर उपचार घेत असलेल्या हॉस्पिटलचा फोटो शेअर केला आहे.

फोटो शेअर करत सुतापाने म्हटले आहे की, लंडनमध्ये पुन्हा येणे आणि या हॉस्पिटलमधील त्याच रुमला बाहेरून पाहणे, मी असच करत होते जेव्हा तो इथे होता.

- Advertisement -

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी बॉलीवूडमधील अनेक पैलू समोर आले आहेत. त्यातून मनी लॉड्ररींग, नेपोटीझम, ड्रग्ज कनेक्शन समोर आले आहे. यामध्ये रिया चक्रवर्तीला अटक झाल्यानंतर दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकूल प्रीस सिंह यांची चौकशी एनसीबी यांच्याकडून करण्यात आली आहे. तसेच इरफान खान यांचा मृत्यू या लॉकडाऊनमध्ये काही महिन्यांपूर्वी कर्करोगाच्या आजाराने झाला होता. गेल्या दोन वर्षांपासून ते कर्करोगावर उपचार घेत होते. त्यामुळे सुतापाने कर्करोगावरील आजाराच्या औषधाची भारतात उपलब्ध होण्याची मागणी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

यंदाही मुंबईची तहान भागणार! सर्व तलावांमध्ये मिळून ९८.९८ टक्के पाणीसाठा!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -