घरताज्या घडामोडीजेव्हा आईशी खोट बोलून लोकलने फिरायला गेली होती सारा, सांगितला मजेशीर किस्सा

जेव्हा आईशी खोट बोलून लोकलने फिरायला गेली होती सारा, सांगितला मजेशीर किस्सा

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान  ( Sara Ali khan) सध्या तिच्या आगामी अतरंगी रे ( Atrangi re) या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. २४ डिसेंबरला हा सिनेमा डिझ्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. सारा अली खान, अक्षय कुमार आणि धनुष पहिल्यांदा एकत्र काम करणार आहेत. सिनेमाच्या प्रमोशनसाठी सारा अली खानने द कपिल शर्मा शोला हजेरी लावली होती. कपिल शर्मा आपल्या शोमध्ये आलेल्या प्रत्येकाला त्याच्या स्टाइलने बोलत करतो. यावेळी साराला देखील कपिलने प्रश्न विचारत बोलते केले आणि साराने तिच्या आईसोबतचा एक किस्सा यावेळ सर्वांसोबत शेअर केला. कॉलेजच्या दिवसात सारा तिची आई अभिनेत्री अमृता सिंह हिच्याशी खोट बोलून फिरायला गेली असता एका पत्रकाराने तिच्या आईला येऊन सांगितल्या साराचे खोटे आईसमोर उघड पडले होते.

- Advertisement -

कपिल शर्मा शोमध्ये सारा म्हणाली, एकदिवस मी शेजारच्या घरात जाते असे सांगून खोट बोलून घरातून बाहेर पडले. शेजाऱ्यांकडे न जाता मी लोकल ट्रेन पकडून एलफिन्स्टन रोड स्टेशनला गेली. त्यावर कपिलने तिला तु एलफिन्स्टन रोडला का गेली होती असे विचारल्यावर साराने लाजत मी माझ्या एका मित्राला भेटायला गेली होती असे म्हटले. सारा पुढे म्हणाली, मी सगळ हँडल करत होती. पण एका पत्रकाराने मला लोकल ट्रेनने फिरताना पाहिलं आणि त्याने माझ्या आईला फोन केला. तुम्ही तुमच्या मुलीला इतक्या चांगल्या पद्धतीने वाढवलं आणि तुमची मुलगी आता लोकल ट्रेनने प्रवास करतेय. माझ्याकडे तिचा फोटो आहे, असे त्याने माझ्या आईला सांगितलं आणि आईसमोर माझं भांड फुटलं.

- Advertisement -

त्यानंतर आईच्या सांगण्यावरुन त्या पत्रकाराने माझा फोटो छापला नाही म्हणून मी वाचले. नंतर मी आईची माफी मागितली आणि आईने देखील मला माफ केलं असे साराने सांगितलं. साराने सांगितलेल्या या किस्स्यानंतर कपिल शर्माने साराची चांगलीच खिल्ली उडवली.


हेही वाचा – Little Little Song : ‘अतरंगी रे’ चं नवं गाणं रिलीज;अक्षय आणि धनुषचा धमाकेदार डान्स

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -