घरमनोरंजनबडे अच्छे लगते हैं -2 मध्ये अभिनेत्री अंजुम फेखला संधी

बडे अच्छे लगते हैं -2 मध्ये अभिनेत्री अंजुम फेखला संधी

Subscribe

बडे अच्छे लगते हैं एक कौटुंबिक मालिका आहे, ज्यामध्ये अनेक पात्रे आहेत. यात प्रियाची बहीण मैत्रीचे पात्र साकारण्यासाठी सुपरिचित टेलिव्हिजन अभिनेत्री अंजुम फेखला घेण्यात आले आहे.

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन लवकरच घेऊन येत आहे ‘बडे अच्छे लगते हैं” या अत्यंत गाजलेल्या मालिकेचा दुसरा सीझन. निर्माता एकता कपूरने सांगितल्याप्रमाणे ही मालिका प्रगल्भ प्रेमाचा गौरव करते. यामध्ये अशा दोन वयाच्या तिशीत असलेल्या व्यक्तींची गोष्ट आहे, जे त्यांचे लग्न झाल्यानंतर हळूहळू एकमेकांच्या प्रेमात पडतात. या मालिकेच्या दुसर्‍या सीझनमध्ये नकुल मेहता आणि दिशा परमार हे कलाकार अनुक्रमे राम आणि प्रिया ह्या लोकांच्या लाडक्या व्यक्तिरेखा साकारणार आहेत. सर्वांना माहीतच आहे की, बडे अच्छे लगते हैं एक कौटुंबिक मालिका आहे, ज्यामध्ये अनेक पात्रे आहेत. यात प्रियाची बहीण मैत्रीचे पात्र साकारण्यासाठी सुपरिचित टेलिव्हिजन अभिनेत्री अंजुम फेखला घेण्यात आले आहे. गेल्या एक दशकापेक्षा अधिक काळापासून अंजुम अभिनय क्षेत्रात काम करत आहे आणि मनोरंजन व्यवसायातील एक होतकरू अभिनेत्री म्हणून तिने नाव कमावले आहे.(Bade Achche Lagte Hain-2 will star actress Anjum Fekh)

 

View this post on Instagram

 

A post shared by Anjum Fakih (@nzoomfakih)


या मालिकेतील आपल्या भूमिकेबद्दल अंजुम म्हणते, “अशा प्रसिद्ध मालिकेचा भाग होताना मला खूपच आनंद होत आहे. मला खात्री आहे की, या मालिकेतील माझी भूमिका मला एक अभिनेत्री म्हणून माझ्यातील कलागुणांचा शोध घेण्यास प्रोत्साहित करेल. ही मालिका शहरी एकाकीपण आणि परिपक्व प्रेमावर आधारित असल्याने, टेलिव्हीजनवरील ‘सास-बहू’च्या गोतावळ्यात ही एक आगळीवेगळी, मनाला आल्हाद देणारी मालिका आहे. या मालिकेच्या निमित्ताने काही तरी नवीन करण्यास आणि माझ्या सह-कलाकारांशी मैत्री करण्यास मी उत्सुक आहे.”

- Advertisement -

हे हि वाचा – बिग बींचा बहुचर्चित ‘चेहरे’ सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार नाही?

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -