Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी Box Office वर साउथ सिनेमांचा बोलबाला, करतायत करोडोंची कमाई

Box Office वर साउथ सिनेमांचा बोलबाला, करतायत करोडोंची कमाई

Subscribe

सिनेसृष्टीत सध्या एकापाठोपाठ एक सिनेमांची चलती सुरू आहे. त्यातही साउथ इंडियन सिनेमांचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला सुरू आहे. प्रेक्षकांमध्ये देखील साउथ इंडियन सिनेमांची क्रेझ पहायला मिळत आहे. नुकताच रिलीज झालेल्या पुष्पा या साउथ इंडियन सिनेमाची सध्या बॉक्स ऑफिसवर चर्चा सुरू आहे. सुपरस्टार अल्लू अर्जुनची प्रमुख भूमिका असलेला पुष्पा सिनेमा प्रेक्षकांनी प्रचंड डोक्यावर घेतला आहे. देशातील सर्व सिनेमागृहांमध्ये फक्त पुष्पा सिनेमाचे शो पहायला मिळत आहेत.  पुष्पाचे दिवसातील सर्व शो हाऊसफुल्ल आहेत. आतापर्यंत पुष्पाने २०० करोडची कमाई केली आहे. मागच्या काही वर्षात साऊथ सिनेमांच्या हिंदी वर्जनने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले ते सिनेमे कोणते आहेत जाणून घेऊयात.

बाहुबली द बिगनिंग

- Advertisement -

एसएस राजामौली दिग्दर्शित बाहुबली या बिग बजेट सिनेमाच्या हिंदी वर्जन बॉलिवूड प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस उतरला. बाहुबली द बिगनिंग हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर पुढचे अनेक महिने सिनेमागृहात हाऊसफ्फुल झाला होता. कटप्पाने बाहुबलीला का मारले या एकच प्रश्न प्रेक्षकांना सिनेमा पाहिल्यानंतर पडला होता. सिनेमाच्या दुसऱ्या पार्टमध्ये प्रेक्षकांना या प्रश्नांचं उत्तर मिळालं. या प्रश्नाामुळे प्रेक्षकांना बाहुबलीचा दुसरा पार्ट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी भाग पाडले. बाहुबली द बिगनींग या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ११८.७० करोड रुपयांची कमाई केली होती.

बाहुबली द कॉन्क्ल्यूजन

- Advertisement -

बाहूबली द बिगनिंगनंतर अभिनेता प्रभासची फॅन फॉलोविंग जबरदस्त वाढली. केवळ साऊथ फॅन फॉलोविंग नाही तर बॉलिवूड प्रेक्षकही प्रभासच्या प्रेमात होते. बाहुबली द कॉन्क्लूजन या सिनेमात प्रेक्षकांना कटप्पाने बाहुबलीला का मारले या प्रश्नाचे उत्तर मिळाले. प्रभासच्या फॅन फॉलोविंगचा या सिनेमाला प्रचंड फायदा झाले असे म्हटले जाते. बाहुबली द कॉन्क्लूजन या सिनेमाच्या हिंदी वर्जनने ५१०.९९ करोड रुपयांची कमाई करत बॉक्स ऑफिसवरचे सगळे रेकॉर्ड्स ब्रेक केले.

2.O

साऊथ सुपरस्टार सुपरस्टार रजनीकांत यांचा 2.O हा तमिळ सिनेमाच्या हिंदी रिमेकने देखील बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई केली होती. अक्षय कुमार आणि रजिनकांत यांच्या तगड्या अभिनयाने सिनेमा एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर १८९.५५ करोड रुपयांची कमाई केली होती.

 

KGF चॅप्टर २

KGF चॅप्टर १ च्या कमाल सक्सेसनंतर kGF चॅप्टर २ ची देखील प्रेक्षकांमध्ये आतूरता आहे.  हा सिनेमा बाहुबली सिनेमासारख्याच हिट होईल असे म्हटले जात आहे.एकूण ५ भाषांमध्ये हा सिनेमा रिलीज करण्यात येणार आहे. KGF1 ने  २५० करोडहून अधिक कमाई केली होती. कन्नड,तमिळ, तेलूगू आणि हिंदी वर्जनमधील हिंदी वर्जनमधला सिनेमाने बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई केली होती. सिनेमात संजय दत्त ,रवीना टंडन,श्रीनिधी शेट्टी, प्रकाश राज कन्नड सुपरस्टार यश हे प्रमुख भूमिकेत असणार आहेत.


हेही वाचा – 83 Box Office Collection : ’83’ सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर धमाका ; चार दिवसांत 54.29 कोटींची कमाई

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -