घरपालघरपारंपरिक व्यवसाय जपत मेंढपाळांची भटकंती सुरू

पारंपरिक व्यवसाय जपत मेंढपाळांची भटकंती सुरू

Subscribe

डिसेंबर महिना सुरु झाला की अनेक मेंढपाळ ठाणे, पालघर जिल्ह्यात येत असतात. सध्या अनेक मेंढपाळ आपल्या मेंढ्यांना सोबत घेऊन त्यांच्या पोटा-पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पालघर जिल्ह्यात भटकंती करताना दिसत आहेत.

डिसेंबर महिना सुरु झाला की अनेक मेंढपाळ ठाणे, पालघर जिल्ह्यात येत असतात. सध्या अनेक मेंढपाळ आपल्या मेंढ्यांना सोबत घेऊन त्यांच्या पोटा-पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पालघर जिल्ह्यात भटकंती करताना दिसत आहेत. गावाकडे दुष्काळी परिस्थिती असून पाण्याची, चाऱ्यांची कमतरता भासते. यामुळे दरवर्षी मेंढपाळ या भागात येऊन अनेक महिने राहून आपल्या मेंढ्यांना व स्वतःच्या पोटा-पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करतात. मेंढपाळ म्हणजे अक्षरशः उपासमार, हालअपेष्टा सहन करून कडक उन्हात, थंडीत उघड्यावर संसार घेऊन फिरणारी जमात. सध्या अहमदनगर, पुणे, सातारा भागातील मेंढपाळ आपल्या मेंढ्या घेऊन डहाणू तालुक्यातील ग्रामीण परिसरातील कासा या भागात आले असून येथील शेतकऱ्यांच्या शेतात पाडाव टाकत आहेत. सध्या येथील वातावरण देखील खुप खराब असून धड थंडी नाही की, धड उन्ह नाही. अशा वातावरणात मेंढ्याच्या तब्येतीची काळजी घेत हा प्रवास करावा लागत आहे.

आम्ही गेल्या पंधरा दिवसापासून ठाणे, पालघर या भागात आलो असून कोरोनामुळे अजूनही पूर्वीसारखी आम्हाला मागणी नाही. येथे मिळणारा हिरवा चारा व भरपूर असलेल्या जंगलातील पाला व मुबलक पाणी यामुळे मेंढ्यांच्या खाण्या-पिण्याची चांगली व्यवस्था होते. काही दिवस मुक्कम करून पुन्हा आपल्या गावी निघणार आहोत.
– काळू धनगर, मेंढपाळ

- Advertisement -

मेंढ्या म्हणजे पोटच्या मुलाप्रमाणे काळजी घ्यावी लागते. हिरवा चारा व पोटभर पाणी मिळेल, या आशेवर यांची भटकंती सुरु असते. शेतकऱ्यांच्या शेतात मेंढ्या बसून त्या बदल्यात काही शिदा, पाणी, पैसा अडका मिळेल व त्यावर उदरनिर्वाह करायचा असा एकंदर विचार असतो. मेंढ्यांचा कळप पाळताना, रात्री मुक्काम करताना खुप काळजी घ्यायला लागते. आजारी मेंढी, जनावरे, कुत्रे यापासून सावधान राहावे लागते. त्यात अजूनही कोरोना पूर्ण संपलेला नाही. येथील शेतकरी देखील गेल्या दोन वर्षापासून संकटातच आहे. अवकाळी पावसाने भातपिके, गवत, पावोली यांचे नुकसान झाल्याने मेंढपाळाना पहिल्यासारखी मागणी नाही. पूर्वी या भागात खेड्यात मेंढापाळ आल्यास शेतकरी आपल्या शेतीत मेंढ्याना मुक्काम ठोकण्यास सांगत. त्यांना लागेल ती शिदा देत असत. आता परिस्थिती बदलली असून त्यामुळे मेंढपाळांवर संकट कोसळले आहे.

(कुणाल लाडे – हे डहाणूचे वार्ताहर आहेत.)

- Advertisement -

हेही वाचा –

Coronavirus: राज्यात पुन्हा निर्बंधाबाबतचे चित्र दोन दिवसात स्पष्ट होणार; राजेश टोपेंचे संकेत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -