घरमनोरंजनपुन्हा एकदा मोहन - अतुल परचुरे

पुन्हा एकदा मोहन – अतुल परचुरे

Subscribe

अभिनेता अतुल परचुरेनं हिंदीमराठी सिनेमात, नाटकात अनेक उत्तमोत्तम भूमिका केल्या आहेत. जागो मोहन प्यारे या लोकप्रिय मालिकेनंतर आता पुन्हा एकदा भागो मोहन प्यारे या मालिकेत प्रेक्षकांना अतुल हा मोहनची व्यक्तिरेखा साकारतानादिसणार आहे. यानिमित्ताने अतुल सोबत साधलेला हा खास संवाद

१. भागो मोहन प्यारे मध्ये आम्हाला आधीचाच मोहन पाहायला मिळणार आहे का?

– हो, जागो मोहन प्यारे मधील मोहन म्हात्रे जसा होता आता देखील प्रेक्षकांना तोच मोहन पाहायला मिळणार आहे. पण जागो मोहन प्यारे मधील साधा-भोळा मोहन हा बायको आणि रोजच्या आयुष्यातील कचाट्यात सापडलेला होता. भागो मोहन प्यारेमध्ये मोहन समोरील आव्हानं थोडी वेगळी आहेत आणि प्रेक्षकांना हा मोहन पाहताना देखील तितकीच मजा येईल.

- Advertisement -

२. मालिकेविषयी थोडक्यात सांगा.

– भागो मोहन प्यारे चा मालिकेच्या मागील भागाशी काहीही संबंध नाही आहे. या मालिकेची कथा पूर्णपणे वेगळी आहे. यावेळी मोहनच्या आयुष्यात एक सुंदरी येणार आहे, पण ती सुंदरी हि एक हडळ आहे. त्यामुळे मोहनचा एका हडळीसोबत संबंधआल्यावर तो काय धमाल होणार आहे हे प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळेल.

- Advertisement -

३. मालिकेच्या प्रोमोजनंतर तुम्हाला प्रेक्षक-चाहत्यांकडून काय प्रतिक्रिया मिळाल्या?

– मालिकेचे प्रोमोज रिलीज झाल्यानंतर मला प्रेक्षकांकडून खूपच चांगल्या आणि सकारात्मक प्रतिक्रिया आल्या. प्रेक्षकांना जागो मोहन मधील मोहन खूपच आवडला होता, त्या मालिकेवर प्रेक्षकांनी प्रेमाचा वर्षाव केला होता. त्यामुळे भागो मोहन प्यारेसाठी देखील प्रेक्षक तितकेच उत्सुक असल्याचं त्यांनी त्यांच्या प्रतिक्रियांमधून कळवलं.

४. या भागात मोहनवर कोणाचा जाच असणार आहे?

– जसं मी याआधी सांगितलं कि या मालिकेत मोहन हा एका हडळीच्या कचाट्यात सापडणार आहे. त्यामुळे स्वभावाने साधा आणि सरळ असलेला मोहन पुढे काय करणार? तिच्या कचाट्यातून कसं सुटणार? हे पाहताना प्रेक्षकांना धमाल येणार आहे.

५. प्रेक्षकांना काय आवाहन कराल?

– बहुतांश कलाकारांचा प्रवास हा अगोदर नाटक आणि मग टीव्ही, सिनेमा असा होतो. परंतु, माझा प्रवास काहीसा उलटा झाला. अभिनय करण्याची पहिली संधी मला मिळाली ती टीव्हीसाठी. सिनेमांतल्या भूमिकांबरोबर रंगभूमीवर आणि मालिकेतमी केलेल्या भूमिकांनी मला प्रेक्षकांच्या खूप जवळ आणलं, तसंच कलाकार म्हणून समृद्ध केलं. मालिकेच्या माध्यमातून मी रोजच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. प्रेक्षक वेळोवळी त्यांच्या प्रेमाने मला माझ्या कामाची पोचपावती देतात. त्यामुळे माझ्या यामालिकेवर आणि त्यांच्या लाडक्या मोहनवर प्रेक्षक तितकंच प्रेम करतील अशी मी आशा करतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -