Bigg Boss Marathi 3: गायत्री दातार रिलेशनशिपमध्ये?

Bigg Boss Marathi season 3 actress gayatri darat in relationship
गायत्री दातार रिलेशनशिप मध्ये?

अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला प्रसिद्ध टीव्ही रिअॅलिटी शो  ‘बिग बॉस’ सिझन ३ अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून ‘तुला पाहते रे’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या गायत्री दातारचाही यात समावेश आहे. गायत्री या घरात आता बऱ्यापैकी रुळली असून तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

ती म्हणजे गायत्री सध्या प्रेमात पडली आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल गायत्री कोणाच्या प्रेमात पडली आहे? तिच्या प्रियकराचे नाव ऐकाल तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. खुद्द बिग बॉस हे तिचे प्रियकर आहेत. बसला ना आश्चर्याचा धक्का? परंतु ही गोष्ट खरी आहे.

सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओच्या माध्यमातून याचा खुलासा झाला आहे. या व्हिडिओमध्ये ती आपल्या प्रियकराबरोबर प्रेमाच्या गोष्टी करताना दिसत आहे. बिग बॉससमोर ती चक्क लाजतेय, त्यांच्यावर रुसतेय. आता गायत्रीचा प्रियकर तिचा हा प्रस्ताव मान्य करणार का, हे पाहण्याची सगळ्यांना उत्सुकता आहे.

तुला पाहते रे’ या मालिकेमुळे गायत्री दातारला एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळख मिळाली. या मालिकेत गायत्रीने ईशाची भूमिकेत झळकली. मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांना अधिकचं भावली.. मुंबईत जन्मलेल्या गायत्रीने पुण्यात शिक्षण घेतले आहे. लहानपणापासूनच गायत्रीला अभिनयाची आणिbiggगा नृत्याची आवड होती. त्यामुळे कॉलेजमध्ये गेल्यावरही तिने आपली आवड जोपासली. तुला पाहते मालिकेसह तिने चला हवा येऊ द्या या रिॲलिटी शोमध्ये काम केले आहे. याशिवाय मराठी नाटकांमध्येही काम केले. मात्र बीग बॉसच्या घरात ती काय कमाल करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.