घरमनोरंजनफिल्ड मार्शल माणेकशॉ यांच्या जीवनावर चित्रपट

फिल्ड मार्शल माणेकशॉ यांच्या जीवनावर चित्रपट

Subscribe

फिल्डमार्शल माणेकशॉ यांच्यावर आधारित चित्रपटात अभिनेता विकी कौशल प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

१९७१ च्या बांग्लादेश मुक्तीसंग्रामात पाकिस्तानला पराभवाची धूळ चाखणारे फिल्ड मार्शल माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनविण्याचा निर्णय दिग्दर्शिका मेघना गुलजार यांनी घेतला आहे. या चित्रपटात उरी फेम अभिनेता विकी कौशल माणेकशॉ यांची भूमिका साकारणार आहे, अशी माहिती मेघना गुलजार यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

- Advertisement -

दरम्यान आज माणेकशॉ यांच्या पुण्यतिथीनिमित्त विकी कौशलने या चित्रपटातील त्याचा फर्स्ट लुक ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. यामध्ये विकीने म्हटले आहे की, भारताचे पहिले फिल्ड मार्शल माणेकशॉ यांची भूमिका साकारण्याचा मला अभिमान वाटत आहे. या निर्भय देशभक्ताचा प्रवास मोठ्या पडद्यावर उलगडण्यासाठी मी प्रचंड उत्सुक आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित या चित्रपटाच्या चित्रीकरणाला २०२१ मध्ये सुरूवात होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -