घरताज्या घडामोडीबॉलिवूडला कोरोनाचा विळखा! परेश रावल निघाले पॉझिटिव्ह

बॉलिवूडला कोरोनाचा विळखा! परेश रावल निघाले पॉझिटिव्ह

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडच्या अनेक कलाकारांना कोरोनाची लागण होत असल्याचे समोर येत आहे. दोन दिवसांपूर्वी मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेला बॉलिवूडचा अभिनेता आमिर खान कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्याचापाठोपाठ अभिनेता आर माधवन सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आढळला. आता त्यानंतर बॉलिवूड लोकप्रिय अभिनेते परेश रावल यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. याबाबत त्यांनी स्वतः ट्विट करून माहिती दिली आहे.

‘दुर्दैवाने, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मागील १० दिवसांमध्ये जे कोणी माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांनी कृपा करून कोरोनाची चाचणी करा,’ अशी विनंती परेश रावल यांनी केली आहे.

- Advertisement -

देशभरात कोरोनाची दुसरी लाट आली आहे, सातत्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. आता बॉलिवूडमध्ये कोरोनाचा विळखा वाढताना दिसत आहे. या कोरोनाच्या जाळ्यात बॉलिवूड कलाकारही अडकत आहेत. दोन दिवसांपूर्वी आमिर खानला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यापूर्वी आमिर खान पानी फाउंडेशनच्या कार्यक्रमात दिसला होता. यामध्ये पत्नी किरण रावसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही उपस्थित होते. तसेच अनेक मंत्री देखील उपस्थित होते.

- Advertisement -

आमिर खान पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्याच्या पाठोपाठ रॅंचोला फॉलोकरत फरहान म्हणजे आर माधवन कोरोनाबाधित झाला. त्याने गमतीशीर अंदाजात कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे सांगितले. तो म्हणाला की, ‘फरहानने नेहमीच रॅंचोला फॉलो केले आहे आणि व्हायरस नेहमी आमच्या मागेच असतो. पण त्याने आम्हा दोघांनाही पकडले आहे. पण ऑल इज वेल आणि आम्ही लवकरच बरे होऊ ही अशी जागा आहे जिकडे राजू पोहोचू नये असे आम्हाला वाटते, असे ट्विट आर माधवनने शेअर केले होते.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -