घरमनोरंजनम्हणून मी गोविंदासोबत कधी काम केले नाही, काजोलचा खुलासा

म्हणून मी गोविंदासोबत कधी काम केले नाही, काजोलचा खुलासा

Subscribe

गोविंदासोबत मी जंगली सिनेमाचे काम सुरु केले होते. सिनेमावर कामही सुरु झाले होते. आम्ही फोटोशूटही केले होते. मात्र तो सिनेमा मधेच बंद पडला.

बॉलिवूडच्या विनोदाचा सुपरस्टार गोविंदा नेहमीच प्रेक्षकांच्या गळ्यात ताईत बनला. त्याचप्रमाणे आपल्या अभिनयातून अनेक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री काजोल. या दोघांनीही आजवर अनेक सिनेमे केले. मात्र दोघेही एकत्र एकाच सिनेमात फार कमी वेळा दिसले असतील. मोठ्या पडद्यावर सुपरस्टार गोविंदासोबत काजोलची जोडी कधीच मात्र कधीच जमली नाही. याबाबत स्वत:च काजोलने खुलासा केला आहे. काजोलने यावेळी सांगितले की, ‘गोविंदासोबत मी जंगली सिनेमाचे काम सुरु केले होते. सिनेमावर कामही सुरु झाले होते. आम्ही फोटोशूटही केले होते. मात्र तो सिनेमा मधेच बंद पडला. त्यानंतर मात्र आम्ही कधीच एकत्र शुटींग केले नाही. गोविंदा हा खूप उत्तम कलाकार आहे. लोकांना हसवणे खूप कठीण काम आहे आणि गोविंदा ते उत्तम करतो’, असे काजोल म्हणाली.

९० च्या दशकात गोविंदा हा बॉलिवूडचा नंबर वन हिरो होता. त्याचा ‘हिरो नंबर वन’ हा सिनेमा त्या काळात खूप गाजला होता. आजही त्या सिनेमाची क्रेझ लोकांना आहे. त्या काळात बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींसोबत गोविंदा सिनेमाच्या मोठ्या पडद्यावर झळकला होता. मात्र अभिनेत्री काजोल सोबत तो कधीच दिसला नाही. ‘भविष्यात माहिती नाही परंतु कधी गोविंदा सोबत काम करण्याती संधी मला मिळाली तर मी नक्की त्याच्यासोबत काम करेन’,असे एका मुलाखतीत काजोल म्हणाली.

- Advertisement -

अभिनेत्री काजोल त्या काळात नंबर वन अभिनेत्रीपैकी एक होती. तिचा ‘दिल वाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘कुछ कुछ होता हे’ हे सिनेमे खूप गाजले होते. काजोला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली होती. शाहरुख खान, सलमान खान, अजय देवगण अशा स्टॉर्ससोबत काजोल अभिनय करताना दिसली होती. मात्र गोविंदा आणि काजोलची जोडी कधीच सिनेमाच्या मोठ्या पडद्यावर पहायला मिळाली नाही.


हेही वाचा – धक्कादायक: सुशांत सिंह राजपूतच्या भावावर अज्ञान व्यक्तींकडून गोळीबार

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -