घरताज्या घडामोडीअभिनेत्री पूजा हेगडेकडे युजरने न्यूड फोटोची केली मागणी अन् मग

अभिनेत्री पूजा हेगडेकडे युजरने न्यूड फोटोची केली मागणी अन् मग

Subscribe

प्रत्येक कलाकार आपल्या चाहत्यांसोबत कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर सक्रिय असतो. आपले अनेक फोटो आणि व्हिडिओ तो चाहत्यांसोबत शेअर करत असतो. तसेच काही वेळा आपल्या व्यस्त कामातून वेळ मिळाल्यावर चाहत्यांसोबत लाईव्ह येऊन बोलतो. सध्या सेलिब्रिटी #AskMe सेशन सुरू करतात आणि पोस्ट अ फोटो ऑफ ट्रेंडमध्ये भाग घेत असतात. येथे चाहते सेलिब्रिटींवर असलेले प्रेम व्यक्त करतात. पण सध्या सोशल मीडियावरील युजर्स याचा चुकीचा वापर करण्याचा प्रयत्न करतात आणि सेलिब्रिटींकडून विचित्र प्रकारची मागणी करतात. अशावेळी काही सेलिब्रिटी उत्तर देतात तर काहीजण दुर्लक्ष करतात, पण अभिनेत्री पूजा हेगडेने एका युजरला अनोख्या पद्धतीने उत्तर दिले आहे.

अभिनेत्री पूजा हेगडेने आपला अभिनय, सुंदरता आणि हास्यामुळे कमी वेळात प्रेक्षकांना आपलंस केलं आहे. पूजाचे इन्स्टाग्रामवर १२.७ मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. अलीकडेच पूजाने आपल्या चाहत्यांसोबत बोलण्यासाठी पोस्ट अ फोटो ऑफ ट्रेंडमध्ये भाग घेतला होता, यामाध्यमातून पूजाने अनेक अनोखे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. यादरम्यानच एका युझरने विचित्र मागणी पूजा हेगडेकडे केली. त्यावेळेस तिने जबदरस्त त्याला उत्तर दिले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pooja Hegde (@hegdepooja)

- Advertisement -

या युजरने पूजाकडे न्यूड (Naked) फोटोची मागणी केली. म्हणून पूजाने त्याला पायांचा फोटो पाठवला आणि लिहिले की, ‘न्यूड पाय.’ सध्या पूजाने दिलेले हे उत्तर सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. पूजाचे चाहते तिचे हे उत्तर पाहून कौतुक करत आहेत.

- Advertisement -

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झालेतर नुकतेच पूजाचा प्रभास सोबतचा ‘राधे श्याम’ चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाली आहे. शिवाय पूजा दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’मध्ये दिसणार आहे. चित्रपटात पूजासोबत रणवीर सिंह आणि जॅकलीन फर्नांडिस मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pooja Hegde (@hegdepooja)


हेही वाचा – दिग्गज सेलिब्रेटींना खुप काही गमवण्याची भीती, शेतकरी आंदोलनावरुन नसरुद्दीन शाह यांचा टोला


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -