घरट्रेंडिंगVideo: नवरदेवाकडून फोटोग्राफरच्या कानफडात, नवरी आली जोमात

Video: नवरदेवाकडून फोटोग्राफरच्या कानफडात, नवरी आली जोमात

Subscribe

लग्न म्हणजे नवरा नवरीच्या आयुष्यातील खास दिवस. लग्न म्हटले की फोटोशूट अलेच. नवरा नवरीने केलेला नट्टापट्टा हा फोटोंसाठीच तर असतो. लग्नात फोटो काढणे यातही वेगळे मज्जा असते. फोटोग्राफरने सांगितलेल्या पोजेस देत नवरा नवरी लाजत का होईना फोटो काढत असतात. मात्र एका लग्नात एक भन्नाट प्रकार घडला आहे. या घटनेचा मजेशीर व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नवरीला फोटोसाठी पोज दे म्हणत फोटोग्राफर फोटो काढत होता. मात्र त्याची फोटो काढायची पद्धत काही नवऱ्याला आवडलेली दिसत नाही. त्यानंतर नवऱ्याने जे काही केलं ते पाहून उपस्थित सर्वांना हसू कोसळले. नवरीतर चक्क लोटपोट होऊन हसत सुटली. लग्नातील हा क्षण सर्वांसाठी यादगार बनला.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये नवविवाहित कपल लग्नाच्या रिस्पेशन नंतर फोटोशूट करत आहेत. फोटोग्राफर नवरीचे सिंगल फोटो काढताना दिसत आहे. फोटोग्राफर त्याच्या स्टाईलने नवरीला फोटोसाठी एक एक पोजेस सांगत असतो. तो तिच्या हनुवटीला, गालाला हात लावून तिला लुक सांगताना दिसत आहे. नवरदेव मात्र फोटोग्राफरच्या मागे उभा राहून हा सगळा प्रकार पाहत असतो. नवरदेव इन्सिक्यूर होऊन त्याचा राग अनावर होतो आणि नवरीचे फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरच्या पाठीच एक जोरदार थपाटा घालतो. हा प्रकार पाहून नवरीला हसणे कंट्रोल होत नाही आणि ती जमिनीवर बसून बेदम हसत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

- Advertisement -

नवरा नवरी आणि फोटोग्राफरचा हा भन्नाट व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. काही तासातचं व्हिडिओला ३ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचप्रमाणे ८०० हून अधिक वेळा व्हिडिओ रिट्विट झाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – झुंज लढवणाऱ्या कोंबड्यांना पोलिसांकडून अटक

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -