घरमनोरंजनतापसीचा कंगनावर पलटवार, कंगनाचा DNAचं विषारी

तापसीचा कंगनावर पलटवार, कंगनाचा DNAचं विषारी

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ती सतत चर्चेचा विषय झाली आहे. कंगना प्रत्येक विषयावर तिचे मत मांडत असते. सध्या सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर कंगना ट्विटरवर चांगलीच सक्रिय दिसत आहे. अमेरिकेची पॉप स्टार रिहाना हिने शेतकऱ्यांना पाठिंबा देणारे ट्विट केले त्यानंतर मात्र भारतीय कलाकारांनी यावर जोरदार टिका केली. मात्र अभिनेत्री तापसी पन्नू हिने ट्विट करुन रिहानाच्या ट्विटवर टिका करणारे आणि सल्ला देणाऱ्याला चांगलेच उत्तर दिले आहे. ‘दुसऱ्यांना शिकवण्यापेक्षा स्वत:चा विश्वास बळकट करा’, असे ट्विट करुन तापसीने रिहानावर टिका करण्यांना चांगलाच टोला लगावला. विषय कोणताही असो त्यात कंगना काही बोलणार नाही असे होत नाही. तापसीच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर तापसी विरुद्धा कंगना असे ट्विटर वॉर रंगलेले पहायला मिळाले.

- Advertisement -

तापसीने नाव घेता केलेल्या ट्विटवर कंगना चांगलीच भडकलेली पहायला मिळाली. तिने थेट तापसीवर हल्लाबोल केला. कंगनानं तापसीला बी ग्रेड म्हटले. त्यानंतर आता तापसीने कंगनावर निशाणा साधत कंगनाच्या डीएनमध्येच विष आहे असे तापसीने म्हटले आहे. तिच्या ट्विटचे उत्तर देताना तापसीने असे म्हणले आहे की,’सोशल मीडियावर आपले विचार मांडायचा जर कोणाला अधिकार असेल तर ती फक्त कंगना रणौत आहे. तिच्या डीएनएमध्येच विष आणि शिव्या भरल्या आहेत’,असे सडेतोड उत्तर तापसीने कंगनाला दिले आहे.


‘जर एका ट्विटमुळे देशाच्या एकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो, एखाद्या मस्करीमुळे तुमच्या विश्वासाला तडा जातो, एका शोमुळे तुमच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात. प्रपोगंडा शिक्षक होण्याऐवजी आपली मूल्य प्रणाली मजबूत करण्याची गरज आहे,असे म्हणत तापसीने बॉलिवूड कलाकारांना एकत्र येण्याचे आव्हान केले आहे. तापसीने नाव घेता ट्विटच्या माध्यमातून कंगनाला चांगलाच टोला लगावला. तापसीच्या या ट्विटनंतर कंगनाने भडकून तापसीला ‘बी ग्रेड’ असे म्हटले आहे. ‘बी ग्रेड लोकांचे बी ग्रेड विचार. आपण आपल्या मातृभूमीसाठी खंबीरपणे उभे राहायला हवे. हाच खरा धर्म आणि कर्म आहे. फुटक खाणारे होऊ नका. म्हणून मी लोकांना बी ग्रेड म्हणते. या लोकांकडे लक्ष देऊ नका’, असे कंगनाने तिच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

तापसीने या ट्विटमध्ये कोणाचेही थेट नाव न घेता शेतकरी आंदोलन, कुणाल कामरा, तांडब वेबसिरिज आणि रिहाना यांना पाठिंबा दर्शवला. रिहानाच्या या ट्विटनंतर अनेक सेलिब्रेटींनी सोशल मीडियावर त्यांची मते मांडायला सुरुवात केली. अनेक राजकिय नेत्यांनीही रिहानावर टिक केली तर काहींनी रिहानाच्या ट्विटमध्ये टिका करण्यासारखे काही नव्हते असे म्हटले आहे.


हेही वाचा – Farmers’ protest: एक माणूस दुसऱ्या माणसासाठी आवाज उठवत आहे – सोनाक्षी

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -