घरदेश-विदेशFarmers’ protest: एक माणूस दुसऱ्या माणसासाठी आवाज उठवत आहे - सोनाक्षी

Farmers’ protest: एक माणूस दुसऱ्या माणसासाठी आवाज उठवत आहे – सोनाक्षी

Subscribe

परदेशी कलाकारांनी माणूस आणि त्याच्या बाजूने बोलण्याचा प्रयत्न करत होते. रिहाना,मिया खलिफा आणि ग्रेटा थनबर्ग या कलाकारांनी उठवलेल्या आवाजात त्यांनी कोणतीही टिका केलेली नाही.

शेतकरी आंदोलनाविरोधात परदेशी कलाकारही बोलू लागल्याने आता शेतकरी आंदोलन आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन पोहचले आहे. अनेक सेलिब्रेटींनी ट्विटरच्या माध्यमातून परदेशी कलाकारांवर टिका केली. सचिन तेंडूलकर, लता मंगेशकर, अक्षय कुमार यांसारख्या अनेक कलाकरांनी टिका केली. त्यातच आता अभिनेत्री सोनाक्षी सिंन्हानेनी तिचे मत व्यक्त केले आहे. इंन्स्टाग्रामच्या माध्यामातून तिने शेतकरी आंदोलनाविषयी भाष्य केलेले पाहायला मिळाले आहे. देशात अशांती पसरवणाऱ्या ज्याप्रकारे वागणूक देतात त्याप्रमाणे वागणूक ही परदेशी कलाकरांनी दिली गेली आहे. या प्रकरणात परदेशी कलाकारांनी माणूस आणि त्याच्या बाजूने बोलण्याचा प्रयत्न करत होते. रिहाना,मिया खलिफा आणि ग्रेटा थनबर्ग या कलाकारांनी उठवलेल्या आवाजात त्यांनी कोणतीही टिका केलेली नाही.

सोनाक्षीने तिच्या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, या आधी तुम्ही रिहाना आणि ग्रेटा आणि इतर लोकांनी भारताच्या अंतर्गत कार्यात हस्तक्षेप केल्याचे तुम्ही एकले. पण त्याआधी हे माहिती असणे गरजेचे आहे की, ते तीनही कृषी कायदा आणि त्यातील छोट्या छोट्या गोष्टीही त्यांना माहिती नाहीत. मात्र काळजी फक्त या गोष्टीची आहे की, त्यांनी उठवलेला आवाज हा मानवाधिकाराचे झालेले उल्लंघन ते इंटरनेट स्थगित करणे, अभिव्यक्ती स्वातंत्र, सरकारचा प्रपोगंडा, सत्तेचा दुरुपयोग केल्याप्रकरणी आहे. मीडियाच्या माध्यमातून जे दाखवण्यात येत आहे त्यातून असे स्पष्ट होत आहे की, बाहेरील लोक देशाची कार्यप्रणाली चालवण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण त्याआधी एक गोष्ट कायम लक्षात ठेवणे गरजेचे आहे ती म्हणजे आवाज उठवणारी ही लोकं कोणी एलियन्स नाहीत. तुमच्या आमच्या सारखेच एकमेकांसाठी आवाज उठवणारी माणसे आहेत, असे सोनाक्षीने तिच्या पोस्ट म्हटले आहे.

- Advertisement -

पत्रकारांना घाबरवण्यात येत आहे. सरकार आणि त्यांच्या मीडिया प्रपोगंडाच्या आधारे एक वेगळे चित्र लोकांसमोर ठेवले जात आहे. तिरस्कार वाटतील अशी भाषणे वापरली जात आहेत. हा मुद्दा देशभरात चर्चेत येत आहे. घरातील हिंसेला घर की बात म्हणतात. आमच्या अंतर्गत गोष्टीमध्ये पडणारे तुम्ही कोण आहात? जाच करणारी लोक डोक्याने काम करणाऱ्या लोकांना घाबरतात. जे त्यांच्यावर अवलंबून नाहीत ते हिंम्मतीने खरे बोलतात, असेही सोनाक्षीने म्हटले आहे.


हेही वाचा – Farmers’ protest: ग्रेटा थनबर्गने भारताविरूद्ध मोहिम योजनेचे डॉक्युमेंट ट्विट करुन केले डिलीट

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -