घरताज्या घडामोडीप्रियांकाला हॅकर्सची धमकी; ...'नाहीतर तुझा पर्सनल डाटा लीक करू'

प्रियांकाला हॅकर्सची धमकी; …’नाहीतर तुझा पर्सनल डाटा लीक करू’

Subscribe

जगात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. तर दुसरीकडे हॅकर्स या संकटात संधीचा फायदा उठवत आहेत. आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून हॅकर्स खंडणीची मागणी करत आहेत. अशाच एका प्रकरणात बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा देखील अडकली आहे.

एनडीटिव्हीच्या वृत्तानुसार, हॅकर्सच्या एका टीमने न्यूयॉर्कमधील एंटरटेनमेंट लॉ Grubman Shire Meiselas And Sacks च्या वेबसाइट हॅक केली असून एका आठवड्यात ४२ मिलियन डॉलर्स म्हणजेच ३१७ कोटी रुपये नाही दिले तर ते यामधील सर्व सेलिब्रिटींची खासगी माहिती इंटरनेटवर पसरवली जाईल, अशी धमकी दिली आहे. हॅकर्सने १२ मे रोजी २१ मिलियन डॉलर्सची मागणी केली होती, परंतु १४ मे रोजी ही रक्कम दुप्पट करून मागितली आहे. पण एंटरटेनमेंट लॉ कंपनीने ही खंडणी देण्यास नकार दिला आहे. यासंदर्भात अमेरिकन एजन्सी एफबीआयने आता तपास सुरू केला आहे.

- Advertisement -

Variety,com रिपोर्टनुसार जवळपास ७५६ जीबीचा माहिती चोरी केली आहे. यामध्ये कंपनीकडून केलेले करार, गुप्त करार, सेलिब्रिटींचे फोन, इमेल आयडी, सोशल मीडिया अकाऊंट, फोन रेकॉर्ड्स अशी प्रकारची संपूर्ण माहिती चोरी केली आहे.

या हॅकर्सजाळ्यात प्रियांका चोप्रासह हॉलिवूडचे सेलिब्रिटी अडकले आहेत. प्रियांका चोप्रा, लेडी गागा, मैडोना, निकी मिनाज, ब्रुस प्रिरंगस्टीन यासारख्या अनेक सेलिब्रिटींची खासगी माहिती हॅकर्सकडे आहे. सध्या प्रियांका चोप्रा अमेरिकेत आहे. तिने तीन दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता.

- Advertisement -

या सेलिब्रिटींच्या व्यतिरिक्त डिस्कव्हरी, ईएमआय म्युझिक ग्रुप, फेसबुक, एचबीओ, आयमॅक्स, एमटीव्ही, एनबीए एंटरटेनमेंट, प्लेबॉय एंटरप्राइजेज, सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स, सोनी क्रॉप, स्पोटिफाई, ट्रिबेका फिल्फ, फेस्टिव्हल, युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप आणि व्हाइस मीडिया ग्रुप या नामाकिंत कंपन्यांसाठी ही कंपनी काम करते.


हेही वाचा – CoronaVirus: …त्यामुळे राज्यातील विजेचे दर वाढू शकतात – ऊर्जामंत्री नितीन राऊत


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -