‘बायबल’ विषयावरील ऑनलाईन क्लासमध्ये सुरू झाला पॉर्न व्हिडिओ आणि….!

सॅन फ्रान्सिस्को शहरातील जुन्या सेंट पॉलच्या लूथरन चर्चच्यावतीने लॉकडाउनच्या काळात बायबलवरील एका विशेष ऑनलाइन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.

aurangabad teacher shows porn video
सातवीच्या विद्यार्थीनीला अश्लिल व्हिडिओ दाखविल्याबद्दल शिक्षकाला अटक

कोरोनाचा फैलाव जगभरात झाला आहे. त्यामुळे भारतासह अनेक देशात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. अनेकजण घरूनच काम करत आहेत. लॉकडाऊनमुळे शाळा, क्लासेसही बंद आहेत. पण या इंटरनेटच्या जगात लोकं एकमेंकांना पासून दूर असली तरी इंटरनेटमुळे जोडली गेली आहेत. लोकांनी कुटुंबाशी कनेक्ट राहण्यासाठी अऍपचा वापर केला. आता याचच फायदा लॉकडाऊनमध्ये होत आहे. लॉकडाउनच्या काळात अनेकजण ऑनलाइन क्लासेस, व्हिडिओ कॉन्फरन्सचा वापर करत आहेत. मात्र, अमेरिकेच्या सॅन फ्रॅन्सिस्कोमध्ये एक वेगळीच घटना समोर आली. बायबलवर सुरू असलेल्या ऑनलाइन वर्गात अचानक पॉर्न व्हिडिओ सुरू झाल्याने खळबळ उडाली.

बायबलवर विशेष क्लासचे आयोजन

सॅन फ्रान्सिस्को शहरातील जुन्या सेंट पॉलच्या लूथरन चर्चच्यावतीने लॉकडाउनच्या काळात बायबलवरील एका विशेष ऑनलाइन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. ‘झूम’ या ऑनलाइन व्हिडिओ चॅटवर विशेष वर्ग भरवण्यात आला. पण बायबलचा वर्ग सुरू असतानाच अचानकपणे पॉर्न व्हिडिओ सुरू झाला. त्यामुळे सगळेच घाबरले आणि एकच खळबळ उडाली. कारण या बायबलवरील विशेष वर्गात लहान मुलांचाही समावेश होता. त्यामुळे चर्चने हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून झूमविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. या ऑनलाइन वर्गाबाबतचा युजर आयडी आणि पासवर्ड हे अधिकाधिक लोकांना देण्यात आला असल्यामुळे ऑनलाइन वर्ग हॅक झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या ऑनलाइन वर्गात लहान मुलांसह वृद्धही मोठ्या संख्येने उपस्थित होते. अचानकपणे या ऑनलाइन वर्गात पॉर्न व्हिडिओ चालवण्यात आला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. धार्मिक कार्यात अडथळा, गोपनीयतेचे उल्लंघन करण्याबाबतची तक्रार देण्यात आली आहे. अशी माहिती चर्चकडून देण्यात आली.


हे ही वाचा – मोलकरणीशी लग्न करायला नकार दिला म्हणून निर्दयी मुलाने केली कुटुंबाची हत्या!