घरताज्या घडामोडीCoronaVirus: कोरोनामुक्त झाल्यानंतर कनिका यांच्यासोबत करतेय टाईम स्पेंड

CoronaVirus: कोरोनामुक्त झाल्यानंतर कनिका यांच्यासोबत करतेय टाईम स्पेंड

Subscribe

कोरोनामुक्त झाल्यानंतर कनिका कपूरने पाहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. चाहत्यांनी तिच्या या फोटोवर खूप प्रतिक्रिया दिल्या आहेत.

‘बेबी डॉल’ सारखी सुपरहिट गाणी गाणारी बॉलिवूड लोकप्रिय गायिक कनिका कपूर कोरोनाची शिकार झाली होती. मागील महिन्यात ती लंडनहून परत आली. मग ती एका पार्टीमध्ये गेली होती. मात्र त्यानंतर कनिकाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आणि तिला लखनऊमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोनाची लागण झाल्यानंतर तिच्यावर कोरोनाबाबत लपवल्यामुळे अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र हे सर्व घटत असून तिने कोरोनाशी झुंज देऊन त्याच्यावर मात केली आणि ती कोरोनामुक्त झाली.

- Advertisement -

कनिकाने कोरोनामुक्त झाल्यानंतर पहिल्यांदा आपल्या चाहत्यांकरिता इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये कनिका आपल्या आई-बाबांसोबत टाईम स्पेंड करताना दिसत आहे. हा फोटो शेअर करताना कनिका कपूरने असे लिहिले आहे की, आपल्याला एक गोड स्मित हस्य, एक प्रेमळ हृदय आणि एक कप चहा याची गरज आहे.

View this post on Instagram

Stay Home Stay Safe ??

A post shared by Kanika Kapoor (@kanik4kapoor) on

- Advertisement -

कनिकाच्या या फोटोवर चाहत्यांनी खूप प्रतिक्रिया दिल्या आहे. सध्या कनिका लखनऊमध्ये आपल्याला आई-बाबांसोबत आहे. तसेच तिच्यावर केलेले आरोप तिने फेटाळून लावत एक पोस्ट लिहून शेअर केली आहे. माझी एअरपोर्टवर कोणतेही स्क्रिनिंग झाली नाही तसेच मला क्वारंटाईनमध्ये राहण्याचा कोणताही सल्ला दिला नाही, असे तिने पोस्टमध्ये लिहिले आहे.


हेही वाचा – ‘सीता-लक्ष्मण’ दोघांनी ‘रामायण’ आधीही केलंय एकत्र काम; फोटो व्हायरल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -