घरमनोरंजन'त्या माझ्या गुरू भगिनी होत्या'; ज्येष्ठ कलाकार अशोक सराफ यांची प्रतिक्रिया

‘त्या माझ्या गुरू भगिनी होत्या’; ज्येष्ठ कलाकार अशोक सराफ यांची प्रतिक्रिया

Subscribe

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे आज, मंगळवारी सकाळी कोरोनाच्या आजारामुळे निधन झाले. साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी नाट्य व सिनेसृष्टीत काम केले आहे. त्यांच्या निधनावर सिनेजगतातून प्रतिक्रिया येत असून ज्येष्ठ कलाकार अशोक सराफ यांनी आशालता यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे. तसेच डॉ. अमोल कोल्हे, अभिनेत्री फैय्याज, निर्माते-दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी प्रतिक्रिया दिल्या आहे.

त्या माझ्या गुरू भगिनी होत्या. एकाच वेळी आम्ही स्टेजवर एंट्री घेतली होती. १९५७ मध्ये आम्ही दोघांनी संशय कल्लोळमध्ये काम केलं होतं. त्या एक चतुरस्त्र अभिनेत्री होत्या. ही नाट्यसृष्टी किंवा चित्रपट सृष्टीची न भरून निघणारी पोकळी आहे.
– अशोक सराफ, ज्येष्ठ अभिनेते

- Advertisement -

१९६५ मध्ये मी मुंबईत आले तेव्हा त्यांची कामं सुरू होती. पुढे नाटकांमधल्या त्यांच्या काही भूमिका मी केल्या. आम्ही समवयस्क नसलो, तरी आमचं करिअर सोबतीने सुरू होतं. निरूपा रॉयनंतर आईचे रोल त्यांनाच मिळायला लागले. त्यानंतर त्या नाटकातून हिंदी चित्रपटांमध्ये जास्त काम करू लागल्या. एक सशक्त अभिनेत्री आपण गमावली आहे.
– फैय्याज, अभिनेत्री

त्या खूप एनर्जेटिक होत्या. मला लाडाने त्या महेशा म्हणायच्या. आयुष्याच्या प्रत्येक गोष्टीची मजा घ्यायच्या. मी नेहमी त्यांना गोबऱ्या गालाची मैत्रिण म्हणून चिडवायचो. बाळासाहेब ठाकरेंना भेटायला गेलो तेव्हा त्यांना सोबत घेऊन गेलो होतो. त्यांना भेटायचो तेव्हा वाटायचं त्या वय विसरून काम करणाऱ्या आहेत. आजच्या पिढीशीही सहज जुळवून घ्यायच्या. त्या नेहमीच कामाच्या बाबतीत सकारात्मक असायच्या.
– महेश टिळेकर, निर्माते-दिग्दर्शक

- Advertisement -

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन झाले. ही दुःखद बातमी ऐकून धक्का बसला. त्या मूळच्या गोव्याच्या होत्या….

Posted by Dr.Amol Kolhe on Monday, September 21, 2020

हेही वाचा –

सविनय कायदेभंग प्रकरणी संदीप देशपांडे यांच्यासह ४ मनसे नेत्यांना अटक!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -