घरमनोरंजनCruise Drugs Bust : NCB चे पुढचे टार्गेट करण जोहर? २ वर्षापूर्वीच्या...

Cruise Drugs Bust : NCB चे पुढचे टार्गेट करण जोहर? २ वर्षापूर्वीच्या पार्टीतील ‘तो’ व्हिडिओ चर्चेत

Subscribe

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूच्या तपासादरम्यान देशातील मोठं ड्रग्ज कनेक्शन समोर आलं आहे. या ड्रग्ज प्रकरणात आत्तापर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची चौकशी करण्यात आली होती. यात अभिनेत्री दिपीका पादुकोन, सारा अली खान, श्रद्धा कपूर, भारती सिंहचा समावेश आहे. मात्र एनसीबीच्या रडारवर अद्यापही अनेक बॉलिवूड कलाकार असल्याचे म्हटले जातेय. अशातच सुशांतच्या मृत्यूनंतरचा करण जोहरच्या हाऊस पार्टीतील व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात चर्चात आला आहे.

त्यावेळी देखील करण जोहरच्या बॉलिवूड स्टारसोबतचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोना दिसला होता.  प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरच्या घरी आयोजित केलेल्या एका पार्टीदरम्यानचा होता. ज्या व्हिडिओमध्ये बॉलिवूडमधील अनेक स्टार्स दिसत होते. करण जोहरच्या या पार्टीमध्ये अनेक स्टार्सनी ड्रग्जचे सेवन केल्याचा दावा करण्यात आला होता. त्या व्हिडिओची चौकशी करण्यात आली मात्र एनसीबीने त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र या व्हिडिओवरून आता एनसीबीचे पुढचे टार्गेट करण जोहर असल्याचे म्हटले जातेय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

- Advertisement -


मात्र करण जोहरने त्यावेळी सर्व आरोप फेटाळून लावले होते. एनसीबीकडून कोणतीही क्लीन चीट मिळाली नसल्याने करण जोहरच्या २०१९ च्या पार्टीचा हा व्हिडिओ पुन्हा एकदा एनसीबीच्या रडारवर असल्याचे म्हटले जात आहे. एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार, एनसीबीने या प्रकरणाचा तपास अद्याप बंद केलेला नाही. इतकेच नाही तर या व्हिडिओच्या चौकशीसाठी केंद्राकडून ६ महिन्यांचा अधिक देण्य़ात आल्याचे म्हटले जातेय.

समीर वानखेडेंनी या प्रकरणाच्या चौकशी सुरु ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली होती, जी केंद्राने मंजूर केली. त्यामुळे येत्या काळात करण जोहरसह बॉलिवूडमधील अनेक कलाकार समीर वानखेडेंच्या निशाण्यावर असल्याचे म्हटले जात आहे.

- Advertisement -

करण जोहरच्या हाऊस पार्टीतील व्हिडिओमध्ये रणबीर कपूर, दीपिका पदुकोण, करण जोहर, विकी कौशल, मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर मद्यधुंद अवस्थेत दिसत होते. या व्हिडिओमध्ये पांढऱ्या रंगाची पावडही दिसत होती. ती पावडर ड्रग्ज असल्याचा दावा अनेकांनी केला होता. मात्र करण जोहरने तो दावा पूर्णपणे फेटाळून लावला.यावेळी करण जोहरने स्टेटमेंटमध्ये म्हटले की, पार्टीत सहभागी सेलिब्रिटींपैकी कोणीही ड्रग्ज घेतले नव्हते. त्या व्हिडिओची चौकशी झाली होती.मात्र अधिकाऱ्यांना चौकशीत काहीच सापडले नाही.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -